जुन्या वादातून युवकावर गोळीबार; 5 जणांवर गाडगेनगर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 04:38 PM2021-02-18T16:38:25+5:302021-02-18T16:39:10+5:30

Firing : या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला प्रथम इर्वीन रूग्णालय व त्यानंतर नागपुर येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

Shooting at a youth from an old argument; Gadgenegar police registered a case against 5 persons | जुन्या वादातून युवकावर गोळीबार; 5 जणांवर गाडगेनगर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

जुन्या वादातून युवकावर गोळीबार; 5 जणांवर गाडगेनगर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

Next
ठळक मुद्दे फिरोज खान अजीस खान (३०, रा. हबीबनगर) असे गोळी लागलेल्या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

अमरावती: जुन्या वादातून एका युवकावर पाच आरोपींनी संगनमत करून त्यातील तीन आरोपींनी त्याच्यावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या तर एका आरोपीने चाकूने जीवघेणा हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील वलगाव येथील अल अजीज हॉलसमोर बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला प्रथम इर्वीन रूग्णालय व त्यानंतर नागपुर येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

फिरोज खान अजीस खान (३०, रा. हबीबनगर) असे गोळी लागलेल्या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. इम्रान अशरफी (पठाण चौक),  इम्रान लंबा, कौशिक पडपा, आबीद खॉ, राजा खॉ, तसेच दोन ते तीन अज्ञात इसम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलीससुत्रानुसार फिर्यादी अफरोज खॉ हाफीज खॉ(२९, रा. हबीब नगर) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ फिरोज खान हे त्याचा मित्र सुलतान सोबत घटनास्थळी बसले असता यातील आरोपी इम्रान अशरफी याच्या इशाऱ्यावरुन यातील तीन आरोपींतानी युवकावर गोळीबार केला त्यातील एक गोळी त्याच्या छातीत लागल्याने तो जाग्यावरच कोसळला तर याील राजा खॉ नावाच्या आरोपीने त्याच्यावर जीवघेणा चाकू हला चढविला त्यानंतर आरोपी पळून गेले. मित्राच्या व नागरिकांच्या मदतीने फिरोज खानला जखमी अवस्थेत येथील इर्विन रुग्णालयात आणले मात्र प्रकृती नाजूक असल्याने पुढील पुढील उपचारकरीता नागपुरला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पथकासह घटनास्थळाला भेटी दिली. पसार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपीविरुद्ध भादविची कलम ३०७,१४३,१४७,१४८,५०४,४/२५,३,२५,५(२७) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शहरात देशी कट्टे येतात कुठून
गत काही महिन्यांमध्ये राजापेठ, गाडगेनगर व नागपुरीगेट हद्दीत देशीकट्टा जप्तीच्या घटना घडल्या आहेत. दहा हजारापासून तर २५ हजार रुपयात अमरावती देशीकट्टा मिळत असल्याचे पोलिसांच्या तपासात आरोपीकडून निष्पन्न झाले आहे. सदर देशीकट्टा शहरात येथो कुठूुन व त्याचा मुळे सुत्राधार कोण? अस प्रश्न सामन्य लोकांना पडला असून शहरात गोळीबार करण्यात आलेल्या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शहरात देशीकट्टा येतो कुठून  त्याचा मुळे सुत्रधाराला अटक करणे गरजचेे आहे.

Web Title: Shooting at a youth from an old argument; Gadgenegar police registered a case against 5 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.