धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:25 PM2020-03-11T16:25:40+5:302020-03-11T16:30:08+5:30

ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटण येथील आहे.

Shocking ... Tantrik baba raped girl by told to a family member to wait outside pda | धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता

धक्कादायक...कुटुंबीयांना बाहेर बसवून तांत्रिक मुलीवर बलात्कार करत होता

Next
ठळक मुद्देझोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. मुलीच्या किंचाळ्याचा आवाज ऐकताच कुटुंबायांनी झोपडीकडे धाव घेतली.

गुजरात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजारी पडली, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला तांत्रिककडे नेले. तांत्रिकाने तिच्या घरच्यांना सांगितले की, तुम्ही बाहेरच बसा, मी आत तिच्यावर उपचार करतो. थोड्या वेळाने आतून किंचाळणं ऐकलं तेव्हा कुटुंबीयांनी आत धाव घेतली. झोपडीत ती मुलगी कपड्यांशिवाय पलंगावर पडली होती आणि तेथे रक्तस्त्राव झाला होता. ही धक्कादायक घटना गुजरातमधील पाटन येथील आहे.

पाटन  जिल्ह्यातील गावात दलित कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी सतत आजारी असायची. तिच्या कुटुंबियांनो बर्‍याच ठिकाणी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. मुलीची तब्येत ठीक नसल्याने कुटुंब राधनपूरमध्ये एका तांत्रिककडे पोहोचले. तांत्रिकने दररोज पाच रविवारी येण्यास सांगितले, परंतु तांत्रिकने मुलीला पाहताच त्याची नियत बदलली. त्याने शुक्रवारी रात्रीच मुलीला आणण्यास सांगितले.

तांत्र‍िक
तांत्र‍िक


शुक्रवारी रात्री कुटुंबीयांसह मुलीने तांत्रिकाची झोपडी गाठली. तांत्रिक आपल्या एका साथीदारासह मुलीला मंदिराच्या मागील झोपडीत घेऊन गेला आणि कुटुंबीयांना बाहेर बसण्यास सांगितले. मुलीच्या किंचाळ्याचा आवाज ऐकताच कुटुंबायांनी झोपडीकडे धाव घेतली. आत पाहिले तेव्हा मुलगी पलंगावर बेशुद्ध पडली होती आणि तिच्या अंगावर कपडे नव्हते. पलंगावर रक्त सांडले होते. तांत्रिक आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पळून गेले होते. कुटुंबीयांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य पाहून ताबडतोब ढोंगी तांत्रिक बाबा व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.


 

Web Title: Shocking ... Tantrik baba raped girl by told to a family member to wait outside pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.