Shocking lover committed suicide by doing facebook live for ex girlfriend | धक्कादायक! प्रेमवेड्याने फेसबुक लाईव्ह करत संपविले जीवन 
धक्कादायक! प्रेमवेड्याने फेसबुक लाईव्ह करत संपविले जीवन 

ठळक मुद्देनिर्मल कुमावत (२०) असं बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.निर्मलने दोन तास आत्महत्येचा लाईव्ह स्ट्रीमिंग केले.  या फेसबुक लाइव्हमध्ये प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला.

राजस्थान - प्यार मे कुछ भी कर सकते है हे वाक्य आपण चित्रपटात ऐकतो. मात्र, राजस्थानच्या अलवरमध्ये एका २० वर्षीय तरुणाने हेच शब्द खरे करुन दाखवले आहे. एक्स गर्लफ्रेंडसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत गळफास लावून आत्महत्या केली आहे. निर्मल कुमावत (२०) असं बेहरोर येथे रहाणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्या करताना निर्मलने फेसबुक या सोशल मीडियावर आपल्या शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. एक्स गर्लफ्रेंडवर असलेले आपले आतोनात प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि  तिच्यासाठी मी मरणही पत्करू शकतो हे  दाखविण्यासाठी निर्मलने आत्महत्या केली. सोमवारी रात्री निर्मलने मोबाईलमधून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले.निर्मलने प्रेमात कशी फसवणूक झाली याबाबत हकीकत सांगितली. त्यानंतर त्याने गोळया खाल्ल्या आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. निर्मलने दोन तास आत्महत्येचा लाईव्ह स्ट्रीमिंग केले. 

लोकांनी या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहिले असे पोलिसांनी सांगितले. या फेसबुक लाइव्हमध्ये प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. निर्मल आत्महत्या करत असताना एकही फेसबुक फ्रेंडने पोलिसांना कळविले नाही. उलटपक्षी लोकांनी कमेंट करत दु:ख होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व २० वर्षीय निर्मलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.


Web Title: Shocking lover committed suicide by doing facebook live for ex girlfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.