Shocking Keralite woman gang rape; Both arrested | धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक
धक्कादायक! कुर्ल्यात महिलेवर सामुहिक बलात्कार; दोघांना अटक

ठळक मुद्देआरोपींनी पीडित महिलेला मेफेड्रॉन (एमडी) जबरदस्तीने तोंडात भरून हे कुकर्म केल्याचे तक्रारीत नमूद30 वर्षीय पीडित महिला 30 डिसेंबरला महिला शौचालयात बाहेर जात असताना रस्त्यात तिघांनी अडवले. महिलेला गुंगी येऊ लागल्यानंतर आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद

मुंबई - कुर्ला येथे विवाहित महिलेवर सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणारे  दोन भामट्यांना कुर्लापोलिसांनी अटक केली. आरोपींनी पीडित महिलेला मेफेड्रॉन (एमडी) जबरदस्तीने तोंडात भरून हे कुकर्म केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अटक केलेल्या आरोपींची नावे मुख्तार शेख(39) व शाहिद खान उर्फ पप्पू(48) अशी आहेत. तर एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
30 वर्षीय पीडित महिला 30 डिसेंबरला महिला शौचालयात बाहेर जात असताना रस्त्यात तिघांनी अडवले. त्यानंतर तिच्या तोंडात तीन आरोपींनी पांढऱ्या रंगाची पावडर कोंबली. त्यानंतर महिलेला गुंगी येऊ लागल्यानंतर आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 31 डिसेंबरला दोन आरोपींना अटक केली. 


Web Title: Shocking Keralite woman gang rape; Both arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.