Shocking! Headless Deadbody found; Police squad at the crime scene | धक्कादायक! सापडला शिर नसलेला मृतदेह; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल
धक्कादायक! सापडला शिर नसलेला मृतदेह; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

ठळक मुद्देदहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरमधील झाडीत शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी पोलिसांचे श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक हजर झाले असून तपास सुरु आहे.

मुंब्रा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ नजीक असलेल्या दहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरमधील झाडीत शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी पोलिसांचे श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक हजर झाले असून तपास सुरु आहे. 

हा पुरुषाचा मृतदेह असून श्वान पथकाच्या सहाय्याने पोलीस झाडीत शिराचा शोध घेत आहेत. मात्र, ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. एका पुरुषाची निर्घृण हत्या करून त्याचे शिरच्छेद केलेले धड मुंब्य्राजवळील डोंगरामधील झुडुपांमध्ये फेकून दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. डोके नसलेला अनोळखी मृतदेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळील उत्तरशीव भागातील दहिसर मोरी परिसरातील ठाकूरपाडा येथील डोंगरभागातील झाडांमध्ये आढळला. एका लहान मुलाने तो प्रथम बघितला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि बिडीची थोटके आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. याप्रकरणी शीळ-डायघर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी श्वान पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाच्या डोक्याचा भाग आढळला नसून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Shocking! Headless Deadbody found; Police squad at the crime scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.