धक्कादायक! विद्यार्थिनीवर चालकाने केला बलात्कार; दिले भररस्त्यात फेकून 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 07:02 PM2019-08-05T19:02:28+5:302019-08-05T19:05:20+5:30

या घटनेने पुन्हा दिल्लीत खळबळ माजली आहे. 

Shocking! Driver rapes student Throwing on the road in semi conscious situation | धक्कादायक! विद्यार्थिनीवर चालकाने केला बलात्कार; दिले भररस्त्यात फेकून 

धक्कादायक! विद्यार्थिनीवर चालकाने केला बलात्कार; दिले भररस्त्यात फेकून 

Next
ठळक मुद्दे २१ वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री मैत्रिणीच्या घरी गेली होती. नशेचा पदार्थ देऊन कॅब चालकाने तिच्यावर बलात्कार केला.याप्रकरणी तिला हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नेले आणि तक्रार देण्यास सांगितली.

नवी दिल्ली - नवी दिल्लीत शुक्रवारी रात्री मैत्रिणीकडून हॉस्टेलकडे  जात असताना कॅब चालकाने जेएनयूच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा दिल्लीत खळबळ माजली आहे. 

जेएनयूमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यानंतर हॉस्टेलकडे जाण्यासाठी मंदिर मार्ग येथून पीडित विद्यार्थिनीने कॅब पकडली आणि त्यानंतर नशेचा पदार्थ देऊन कॅब चालकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कॅब तीन तास फिरवून तिला अर्धवट शुद्धीत असताना दक्षिण दिल्लीतील एका पार्कजवळ रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर स्थानिकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले. उपचारानंतर पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलला गेली आणि तिने हॉस्टेलच्या अधिकृत व्यक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, याप्रकरणी तिला हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नेले आणि तक्रार देण्यास सांगितली. पीडित तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला असून पोलीस आरोपी कॅब चालकाचा शोध घेत आहेत. 

Web Title: Shocking! Driver rapes student Throwing on the road in semi conscious situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.