Shocking A 15-year-old girl has been sexually assaulted by auto-pilot mode | धक्कादायक! विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण 
धक्कादायक! विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण 

ठळक मुद्देकोट्यधीश व्यापारी पाच वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो.स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असं आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो.

न्यू जर्सी (अमेरिका ) - विमान ऑटो पायलट मोडवर टाकून अल्ववयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अमेरिकेतील एका कोट्यधीश व्यापारी पाच वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतो. स्टीफन ब्रॅडली मेल (५३) असं आरोपीचे नाव असून तो न्यू जर्सी येथे रहातो. आंतरराज्यीय प्रवासात बेकायद लैंगिक कृत्य करणे आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचे आरोप त्याने मान्य केले आहेत.

स्टीफन मेल तीन मुलांचा बाप असून त्याची ब्रोकरेज कंपनी आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. पीडित मुलीला विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी तिच्या आईने आरोपीशी संपर्क साधला होता. शिक्षा सुनावण्याआधी स्टीफनच्या वकिलांनी तो चांगला माणूस असल्याचा युक्तीवाद केला. स्टीफन मेलने एअर लाइफलाइन ही चॅरिटी सुरु केली होती. त्याअंतर्गत वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या लहान मुलांना तो अमेरिकेतील वेगवेगळया भागांमध्ये सोडत असे. 


Web Title: Shocking A 15-year-old girl has been sexually assaulted by auto-pilot mode
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.