Share Market Scam : आज संध्याकाळपर्यंत मी पोलिसात हजर होणार, विशाल फटे जनतेसमोर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:28 PM2022-01-17T14:28:27+5:302022-01-17T14:33:24+5:30

शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना शेकडो कोटींचा गंडा घालून गेलेल्या विशाल फटेच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके राज्यासह परराज्यातही रवाना झाली आहेत.

Share Market Scam : By this evening I was about to appear before the police, vishal fate on share market scame | Share Market Scam : आज संध्याकाळपर्यंत मी पोलिसात हजर होणार, विशाल फटे जनतेसमोर आला

Share Market Scam : आज संध्याकाळपर्यंत मी पोलिसात हजर होणार, विशाल फटे जनतेसमोर आला

Next

सोलापूर/बार्शी - जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ज्या नावाची चर्चा आहे, तो शेअर मार्केट घोटाळ्यातील आरोप विशाल फटे यांनी युट्युबद्वारे आपली बाजू मांडली आहे. मी आज संध्याकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असून पोलिसांनीही माझा शोध घेण्यासाठी धावपळ करण्याची गरज नसल्याचे विशालने व्हिडिओच्या माध्यमातून सांगतिले आहे. विशेष म्हणजे मी कुणालाही बुडवलं नसून माझा तसा उद्देशही नसल्याचे त्याने म्हटले आहे. 

शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना शेकडो कोटींचा गंडा घालून गेलेल्या विशाल फटेच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके राज्यासह परराज्यातही रवाना झाली आहेत. या घटनेतील मुख्य फिर्यादी दिपक आंबारे यालाही पोलिसांनी सोबत नेले आहे. विशालने शेवटच्या टप्प्यात कित्येक व्यापाऱ्यांना टोपी घातली आहे. अनेकांनी आपली 2 नंबर कमाईची कोट्यवधींची रक्कम त्याच्याकडे जमा केली आहे. मात्र, फिर्याद द्यायची कशी त्यामुळे ते पैसे आमचे नव्हतेच, असेच ते म्हणत आहेत. मात्र, आता विशालनेच पुढे येऊन तक्रार द्यायची असेल तर द्या, पण मी पोलिसांसमोर हजर होत आहे, असे म्हटले आहे.  

माझ्याकडे 200 कोटी रुपये असल्याच्या बातम्या झळकल्या पण मी एवढे पैसै घेतले नाहीत. अधिकाधिक 30 ते 40 कोटी रुपयांचा आकडा असू शकतो, असेही विशालने स्पष्ट केले आहेत. तसेच, मी अनेकांना 6 महिन्यात पैस डबल कमावूनही दिल्याचे त्याने म्हटले. 
 

Web Title: Share Market Scam : By this evening I was about to appear before the police, vishal fate on share market scame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.