Shame! The youth was shown private part to girl in the metro with vulgar gestures | लज्जास्पद! तरुणीला मेट्रोमध्ये भामट्याने दाखवले गुप्तांग काढून अन् केले अश्लील इशारे
लज्जास्पद! तरुणीला मेट्रोमध्ये भामट्याने दाखवले गुप्तांग काढून अन् केले अश्लील इशारे

ठळक मुद्देपीडित तरुणीने आपल्या ट्विटर हँडलवरून डीएमआरसी यांना ट्विट टॅग करून ग्रे जॅकेट आणि पुढे बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी तिने घिटोरनी मेट्रो स्टेशनवर तक्रार दाखल केली. 

नवी दिल्ली - ६ फेब्रुवारीला गार्गी कॉलेजच्या फेस्टदरम्यान बाहेरून कॉलेजात घुसलेल्या टोळक्याने तरूणींसोबत घडलेली छेडछाडीची घटना ताजी असताना दिल्लीत तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने महिलेला आपले गुप्तांग दाखवून अश्लिल इशारे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दिल्ली मेट्रोच्या येल्लो लाईनवर घडला आहे. तरूणीने स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.पीडित तरुणीने आपल्या ट्विटर हँडलवरून डीएमआरसी यांना ट्विट टॅग करून ग्रे जॅकेट आणि पुढे बॅग घेतलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. यात मेट्रो ट्रेनच्या गेटवर उभा दिसत आहे. मी सातव्या डब्ब्यात दोन सीट असलेल्या जागेवर बसली होती. मो येल्लो लाईनहून गुडगावला निघाले होते. ही घटना सायंकाळी ६ वाजताची आहे. मी आपल्या ऑफिसमधून घरी परतत होती. अचानक अज्ञात व्यक्तीने गुप्तांग काढले आणि माझ्यासमोर बसला होता. गुप्तांग दाखवून माझ्याकडे अश्लील इशारे करू लागला. मी खूप घाबरलेली असल्याची माहिती पीडित तरुणीने तक्रारीत दिली आहे. 

सुरूवातीला तिला काहीच समजले नाही, की काय करायचे. नंतर तिने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीला तिला धीर देत याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी सकाळी ९.३० मिनिटांनी तिने घिटोरनी मेट्रो स्टेशनवर तक्रार दाखल केली. मेट्रोमधील या घटनेमुळे ती पीडित तरुणी घाबरलेली होती. पण त्याही परिस्थितीत तिने त्या भामट्याचा फोटो आपल्या मोबाईवर काढले. ते तिने आपल्या ट्विटरवर शेअरही केले आहे. मोबाईलमधील फोटोच्या डिटेलवरून समजले की बुधवारी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी ही घटना सुल्ताननगर वॉटर ट्रिटमेंट प्लांट जवळ हे फोटो घेतले आहे अशी माहिती पीडित तरुणीने तक्रारीत दिली आहे. 

Web Title: Shame! The youth was shown private part to girl in the metro with vulgar gestures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.