लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:22 PM2021-05-11T18:22:49+5:302021-05-11T18:24:44+5:30

Superstition : मांत्रिकाचे ऐकून महिला पतीसोबत मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी आली. त्यावेळी या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली.

Shame! Under the pretext of exorcism, exorcist gave alcohol to a woman and tortured her | लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार 

लज्जास्पद! भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार 

Next
ठळक मुद्देसंगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक गावातील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होता. डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ती एका भोंदूबाबाकडे गेली.पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि या मांत्रिकाला अटक केली

भोंदूबाबा नागरिकांमधील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या याआधी देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. संगमनेरच्या पारेगाव बुद्रूक या गावात एक असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव बुद्रुक गावातील एका महिलेला गेल्या अनेक दिवसांपासून काही त्रास होत होता. डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याऐवजी अंधश्रद्धेला बळी पडत ती एका भोंदूबाबाकडे गेली. सावित्रा गडाख या भोंदूबाबाने महिलेला तुझ्यावर भूतबाधा झाली आहे. तुझ्या अंगातले भूत उतरावं लागेल अशी बतावणी केली. महिलेनेही त्या मांत्रिकावर विश्वास ठेवला.

मांत्रिकाचे ऐकून महिला पतीसोबत मांत्रिकाकडे भूतबाधा उतरवण्यासाठी आली. त्यावेळी या मांत्रिकाने महिलेला बळजबरी दारू पाजली. त्यानंतर तिला शेतामध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. या सर्व लज्जास्पद प्रकारानंतर महिलेने या मांत्रिकाविरोधात संगमनेर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधत कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि या मांत्रिकाला अटक केली आहे, अशी माहिती न्यूज१८ लोकमतने दिली आहे. 

Web Title: Shame! Under the pretext of exorcism, exorcist gave alcohol to a woman and tortured her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.