Sexual harasshment of the student by the teacher in the nigadi | निगडीत शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार
निगडीत शिक्षकानेच केला विद्यार्थ्यावर लैगिंक अत्याचार

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील एका शाळेतील पीटीच्या (शारीरिक शिक्षण) शिक्षकाने शाळेतल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार जानेवारी महिन्यापासून सुरु होता. पीडित मुलाने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  मुलाच्या वडिलांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनुराग रामदास हिंगे (रा. देहुगाव) या पीटी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुराग हा निगडी प्राधिकरणातील एका नामांकित शाळेत पीटी शिक्षक आहे. जानेवारी महिन्यात त्याने शाळेतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला शाळेतील एका खोलीत बोलावून घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी शिक्षक अनुराग याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ भोये पुढील तपास करत आहेत.


Web Title: Sexual harasshment of the student by the teacher in the nigadi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.