अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; वृध्दाला १४ वर्ष कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:16 PM2020-09-17T16:16:36+5:302020-09-17T16:17:06+5:30

महाजन याला न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.

Sexual abuse to minor girls; Old man sentenced to 14 years in prison | अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; वृध्दाला १४ वर्ष कारावास

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; वृध्दाला १४ वर्ष कारावास

Next
ठळक मुद्दे१८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष हरचंद महाजन याने पीडित बालिकेला किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

जळगाव - किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने ११ वर्षीय मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात सुभाष हरचंद महाजन (५५, रा.वाडे, ता.भडगाव) याला जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. महाजन याला न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.


या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष हरचंद महाजन याने पीडित बालिकेला किराणा दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेच्या वडीलांनी भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन कलम ३७६ (२)(आय)(एच) व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारतर्फे अ‍ॅड.चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन वाईट कृत्याच्या परिणामाबाबत समाजात योग्य संदेश जावा यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. न्यायालयासमोर आलेले पुरावे व अ‍ॅड.बोरसे यांचा युक्तीवाद पाहतान्यायालयाने महाजन याला दोषी ठरविले व १४ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.आरोपीतर्फे अ‍ॅड.मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

 

Web Title: Sexual abuse to minor girls; Old man sentenced to 14 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.