seraikela kharsawan 60 people gang raped 30 days 22 years old woman drug injection needle hostag | क्रूरतेचा कळस! तरुणीवर तब्बल 60 जणांनी केला 30 दिवस बलात्कार; शरीरावर असंख्य जखमा

क्रूरतेचा कळस! तरुणीवर तब्बल 60 जणांनी केला 30 दिवस बलात्कार; शरीरावर असंख्य जखमा

नवी दिल्ली - झारखंडच्या जमशेदपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षीय तरुणीवर तब्बल 60 जणांनी 30 दिवस बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तरुणीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या गावात राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर 30 तिला एका खोलीस कोंडून ठेवण्यात आलं. याच दरम्यान जवळपास 60 जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे.  

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं अपहरण करून तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं. त्यानंतर तरुणी नशेत राहावी यासाठी तिला सातत्याने इंजेक्शन देण्यात आले. एक महिना हे सुरू होतं. त्याचवेळी 60 जणांनी बलात्कार केला. तरुणीने महिन्याभरानंतर पळ काढून यातून आपली सुटका करून घेतली. पीडितेला पाहिल्यावर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

पीडित तरुणीच्या शरीरावर इंजेक्शनमुळे असंख्य जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. बलात्कार करणाऱ्यांना विरोध केला असता त्यांनी मारहाण केल्याची माहिती देखील तरुणीने पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून काहींची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. 

हाथरसची पुनरावृत्ती! छेडछाडीची तक्रार केल्याने पीडितेच्या आईची गोळ्या झाडून हत्या

मुलीची छेड काढल्याची तक्रार करणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची हाथरसमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हाथरसची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारच्या पाटणामध्ये मुलीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पाटणा शहरातील फतुहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या मुलीची गुंडापासून सुटका करण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. फतुहा हद्दीतील जग्गू बिगहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. 

Web Title: seraikela kharsawan 60 people gang raped 30 days 22 years old woman drug injection needle hostag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.