Sensation! Teachers raped blind minor student in gujarat | खळबळजनक! अंध विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला बलात्कार
खळबळजनक! अंध विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला बलात्कार

ठळक मुद्देशाळेतील शिक्षक चमन ठाकोर (६२) आणि जयंती ठाकोर (३०) यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली.दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालनपूर - १५ वर्षीय अल्पवयीन अंध विद्यार्थिनीवर अंध शिक्षकांनीच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुजरातमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका ६२ वर्षीय शिक्षकाचा सहभाग आहे. १५ वर्षीय अल्पवीयन मुलीवर जवळपास चार महिने लैंगिक छळ करण्यात आला. अंबाजी येथील मंदिरात एका खासगी संस्थेकडून शाळा चालवली जात असून त्याठिकाणी हा प्रकार घडला आहे. दोन्ही शिक्षकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ नोव्हेंबरला मुलीच्या मावशीने दाखल केलेल्या तक्रारीत पहिल्यांदा जयंती ठाकोरने दोन महिन्यांपूर्वी म्युझिक रुममध्ये मुलीचा लैंगिक छळ केला. यानंतर तीन दिवसांनी चमन ठाकोरने त्याच रुममध्ये मुलीवर बलात्कार केला असलायची माहिती दिली आहे. शाळेतील इतर तीन शिक्षकांना यासंबधी सांगितल्यानंतर हा प्रकार थांबला असं मुलीने सांगितलं. आम्ही तपास सुरु केला असून फरार आरोपी शिक्षकांना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती अंबाजीचे पोलीस निरीक्षक जे. बी. अग्रवात यांनी दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही शिक्षकांना शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे.

मुलगी दिवाळीच्या सुट्टीत मावशीच्या घऱी गेली होती. यावेळी तिने मावशीला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित मुलीने आठवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण घेतलं होतं. यानंतर म्युझिक शिकण्यासाठी तिने शाळेत प्रवेश घेतला होता. अल्पवयीन अंध मुलगी शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्याने कुटुंबियांना संशय आला. यानंतर तिने शाळेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. शाळेतील शिक्षक चमन ठाकोर (६२) आणि जयंती ठाकोर (३०) यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली.
 

Web Title: Sensation! Teachers raped blind minor student in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.