senior citizen manhandled, the incident at Marusal | क्षुल्लक कारणावरून वृद्धास मारहाण, मारसूळ येथील घटना  
क्षुल्लक कारणावरून वृद्धास मारहाण, मारसूळ येथील घटना  

मालेगाव (वाशिम) - तालुक्यातील मारसूळ येथे उत्तमराव निवृत्ती घुगे (वय - ७०) या वृद्धास त्याच गावातील तिघांनी क्षुल्लक कारणावरून लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमराव घुगे यांची नात ही जानराव घुगे यांच्या घरासमोरील रस्त्यावर सायकल खेळत असताना तिला लाटलोट करण्यात आली. याबाबत जाब विचारला असता, उत्तमराव घुगे यांना जानराव घुगे, मधूकर घुगे आणि अनिल घुगे यांनी लोकडी काठीने मारहाण केली. यात त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद तीनही आरोपींविरूद्ध भा. दं. वि. चे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव राठोड करित आहेत.


Web Title: senior citizen manhandled, the incident at Marusal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.