पाणी भरून टोसिलिजुमॅब इंजेक्शन दीड लाखाला विकायचा;  त्याच पैश्यातून गर्लफ्रेडला घेतले महागडे गिफ्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 03:42 PM2021-05-06T15:42:49+5:302021-05-06T15:54:56+5:30

Crime news : या भामट्याच्या घरी फ्रीज, कुलर, कपाट,मोबाईल्स यांसारखी सगळीच अत्याधुनिक  साहित्य आहेत.  

Selling tosi the accused bought coolers fridges and year round rations gave expensive gifts to girlfriends | पाणी भरून टोसिलिजुमॅब इंजेक्शन दीड लाखाला विकायचा;  त्याच पैश्यातून गर्लफ्रेडला घेतले महागडे गिफ्ट्स

पाणी भरून टोसिलिजुमॅब इंजेक्शन दीड लाखाला विकायचा;  त्याच पैश्यातून गर्लफ्रेडला घेतले महागडे गिफ्ट्स

googlenewsNext

(Image Credit- Dainik Bhaskar)

कोरोना व्हायरसच्या महामारीत लोक एकमेकांना मदत करण्याऐवजी एकमेंकाच्या आयुष्याशी खेळत आहेत. पैशाच्या लालसेपोटे रुग्णांचा जीव धोक्यात घालून वाटेल ते कृत्य केलं जात आहे. मध्यप्रदेशातील इंदूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. आरोपीनं बाटल्यांमध्ये पाणी भरून टोसिलिजुमॅब हे इंजेक्शन जवळपास  दीड लाख रूपयांना विकलं आहे. इतकंच नाही तर या भामट्याच्या घरी फ्रीज, कुलर, कपाट,मोबाईल्स यांसारखी सगळीच अत्याधुनिक साहित्य आहेत.  

इंजेक्शनचा काळा बाजार करून ही व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला पैसे देत होती. इतकंच नाही तर त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला हजारो रुपयांचे कपडे आणि अनेक प्रकारचे गिफ्टस सुद्धा दिले होते. लॉकडाऊननंतर आरोपी गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जाणार होता. 

इंदूरमधील पूर्व एसपी आशुतोष बागरी यांनी सांगितले की, ''टोसिलिजुमॅब हे इंजेक्शन विकणारा पकडला गेला असून सुरेश यादव असं  २९ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.  सरेश हा लक्ष्मणपुरा गल्ली नंबर ३ बाणगंगा परिसरात वास्तव्यास आहे.''

मोठी कारवाई! अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे 7 किलो युरेनियम जप्त; महाराष्ट्र एटीएसकडून दोघांना अटक

एका पीडितानं या व्यक्तीबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार इंजेक्शन असल्याचं सांगत बाटलीत पाणी भरून विकलं जात होतं. आरोपी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून आता मोबाईल बंतर ब्लॉक केला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती फक्त महिलांना  हे इंजेक्शन विकत होती.

इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघे ताब्यात, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार इंजेक्शनसाठी मेसेज यायचा. तेव्हा तो प्रथम शोधून काढेल की ज्याला इंजेक्शनची गरज आहे ती एक स्त्री आहे की पुरुष. त्यानंतर तो तिच्याशी व्यवहार करायचा. मुलींना सहज इंजेक्शन्स विकायचा तर पुरूषांना त्यांने फार कमी वेळा इंजेक्शन दिले होते. 

Web Title: Selling tosi the accused bought coolers fridges and year round rations gave expensive gifts to girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.