विहीर प्रस्ताव मंजुरीसाठी ५ हजारांची लाच घेताना सरपंच पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 11:02 PM2020-09-23T23:02:46+5:302020-09-23T23:03:50+5:30

याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Sarpanch's husband arrested while accepting bribe of Rs 5,000 for approval of well proposal | विहीर प्रस्ताव मंजुरीसाठी ५ हजारांची लाच घेताना सरपंच पतीला अटक

विहीर प्रस्ताव मंजुरीसाठी ५ हजारांची लाच घेताना सरपंच पतीला अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील महिला सरपंच यांचे पती राजकुमार महालिंग शेटे (३५) यांनी सदरील तक्रारदाराकडे ग्रामपंचायतीकडे दाखल करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या प्रस्ताव मंजुरीसाठी ७ हजारांच्या लाचेची मागणी केली.

लातूर : सिंचन विहीर मंजूर करून घेतो म्हणून ५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सरपंच पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.


चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील महिला सरपंच यांचे पती राजकुमार महालिंग शेटे (३५) यांनी सदरील तक्रारदाराकडे ग्रामपंचायतीकडे दाखल करण्यात आलेल्या सिंचन विहिरीच्या प्रस्ताव मंजुरीसाठी ७ हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, संबंधित लाभार्थ्याने लातूरच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तडजोडीअंती पाच हजार रुपये आता आणि उर्वरित २ हजार रुपये नंतर देण्याचे मान्य झाले. बुधवारी चाकुरातील एका जनरल स्टोअर्ससमोर एसीबीने सापळा लावला. तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताना सरपंच पती राजकुमार शेटे यास पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

 

Web Title: Sarpanch's husband arrested while accepting bribe of Rs 5,000 for approval of well proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.