मनसेला दणका! संदीप देशपांडे यांच्यासह इतर ३ मनसैनिकांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 07:01 PM2019-11-01T19:01:43+5:302019-11-01T19:03:43+5:30

तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Sandeep Deshpande along with 3 other sent to judicial custody till November 14 | मनसेला दणका! संदीप देशपांडे यांच्यासह इतर ३ मनसैनिकांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

मनसेला दणका! संदीप देशपांडे यांच्यासह इतर ३ मनसैनिकांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्दे कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई - पालिकेच्या अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह इतर तिघांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३५३, १४१, १४२, १४३, ५०४, ५०६ नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचे देशपांडे म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिघावकर यांना दिला. मनसेच्या कंदिलांवरून महापालिकेच्या कारवाईनंतर दादर-माहिम मधलं राजकीय वातावरण तापलेलं आहे

Web Title: Sandeep Deshpande along with 3 other sent to judicial custody till November 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.