From Saidaba temple has stole silver footwear | साईधाम मंदिरातील साईबाबांच्या चांदीच्या पादुका चोरल्या
साईधाम मंदिरातील साईबाबांच्या चांदीच्या पादुका चोरल्या

ठळक मुद्देगावठाणामधील आणि विरार रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील साईधाम मंदिरात साई बाबांच्या 20 हजार रुपये किमतीच्या 500 ग्राम वजनाच्या चांदीच्या पादुका होत्या. पुजारी संकेत यांनी विरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.   

नालासोपारा - विरार पश्चिमेकडील गावठाण मधील ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्टच्या साईधाम मंदिरामधील साईबाबांच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी दिवसाढवळ्या घडली आहे. विरारपोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी देहही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे.

गावठाणामधील आणि विरार रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरील साईधाम मंदिरात साई बाबांच्या 20 हजार रुपये किमतीच्या 500 ग्राम वजनाच्या चांदीच्या पादुका होत्या. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मंदिर पुजारी संकेत संतोष मुळे (23) हे मंदिराच्या स्टाफ रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेले व पंधरा मिनिटांत कपडे बदलून बाहेर आल्यावर कोणत्या तरी चोरट्याने साईबाबांच्या त्या चांदीच्या पादुका चोरी करून पळून गेला होता. पुजारी संकेत यांनी विरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.   
 


Web Title: From Saidaba temple has stole silver footwear
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.