Sachin Vaze : सचिन वाझेंविरोधात एनआयएनं लावली दहशतवादी कृत्याची कलमं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:05 PM2021-03-24T19:05:55+5:302021-03-24T19:06:48+5:30

Antilia bomb scare probe: NIA ने सचिन वाझे यांच्या विरोधात यूएपीए म्हणजेच Unlawful Activities Prevention Act हा कायदा लावण्याची मागणी केली आहे.

Sachin Vaze: Terrorism act UAPA sections imposed by NIA against Sachin Vaze | Sachin Vaze : सचिन वाझेंविरोधात एनआयएनं लावली दहशतवादी कृत्याची कलमं

Sachin Vaze : सचिन वाझेंविरोधात एनआयएनं लावली दहशतवादी कृत्याची कलमं

Next
ठळक मुद्देएनआयएने सचिन वाझेंविरोधात यूएपीएची कलम १६ आणि १८ लावण्यात आली आहे. एनआयएच्या हाती सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्काम केल्याचे आणखी काही तपशील समोर आले होते.

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर UAPA (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) अंतर्गत कारवाई होणार आहे. एनआयएने सचिन वाझेंविरोधात यूएपीएची कलम १६ आणि १८ लावण्यात आली आहे. एनआयएच्या हाती सचिन वाझे यांच्या ट्रायडंट हॉटेलमधील मुक्काम केल्याचे आणखी काही तपशील समोर आले होते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही ठेवण्यात महत्वाची भूमिका असल्याने वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. 

NIA ने सचिन वाझे यांच्या विरोधात यूएपीए म्हणजेच Unlawful Activities Prevention Act हा कायदा लावण्याची मागणी केली आहे. यूएपीए कायदा लागल्याने सचिन वाझे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा कायदा दहशतवाद्यांवर किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग असणाऱ्यांविरोधात  लावला जातो. सोमवारी NIA ने सचिन वाझे राहत असलेल्या ट्रायडंटमधील रूमची झाडाझडती घेतली होती. याठिकाणी NIA च्या अधिकाऱ्यांचे जवळपास तीन तास सर्च ऑपरेशन सुरु होते. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांनी ट्रायडंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज घेऊन जप्त केले होते.

 

 

 

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या काळात ट्रायडंट हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. त्यानंतर २४ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सोडण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण कट ट्रायडंट हॉटेलमध्येच शिजला असल्याचा संशय NIAला आहे. तसेच या हॉटेलमध्ये वाझे यांच्यासोबत असलेल्या संशयित महिलेबाबत देखील कसून तपास NIA करत आहे. 

Sachin Vaze : सुशांत सदाशिव खामकर या नावाने ट्रायडंटमध्ये राहत होते वाझे; बोगस आधारकार्ड NIA च्या हाती 

Web Title: Sachin Vaze: Terrorism act UAPA sections imposed by NIA against Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.