रशियन तरुणी प्रियकराच्या शोधात पोहोचली पाकिस्तानात अन् अचानक हॉटेलच्या इमारतीवरून मारली उडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:09 AM2022-01-06T10:09:21+5:302022-01-06T10:10:01+5:30

Pakistan : रशियन तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत दुबईहून (Dubai) पाकिस्तानात पोहोचली होती. प्रियकर न सापडल्याने तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने येथील एका हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली.

Russian woman's suicide bid after failure to meet friend in Pakistan | रशियन तरुणी प्रियकराच्या शोधात पोहोचली पाकिस्तानात अन् अचानक हॉटेलच्या इमारतीवरून मारली उडी 

रशियन तरुणी प्रियकराच्या शोधात पोहोचली पाकिस्तानात अन् अचानक हॉटेलच्या इमारतीवरून मारली उडी 

Next

इस्लामाबाद : प्रियकराचा (Boyfriend) शोध घेत असताना एक रशियन तरुणी (Russian Girl)पाकिस्तानात पोहोचली, मात्र तिथे असे काही घडले की तिने हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) मुलतानमधील आहे. रशियन तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत दुबईहून (Dubai) पाकिस्तानात पोहोचली होती. प्रियकर न सापडल्याने तिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने येथील एका हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली.

'डॉन'च्या वृत्तानुसार, रशियन तरुणीचे नाव कॅरिस्टिना मर्कुलोवा (Karistina Merkulova) असे आहे. तिने दावा केला आहे की, मूळचा पाकिस्तानचा अब्दुल्ला (Abdullah) नावाचा व्यक्ती तिचा प्रियकर आहे आणि दोघेही दुबईत एकत्र राहत होते. एके दिवशी अचानक अब्दुल्ला तिला दुबईत सोडून पाकिस्तानला आला. त्यामुळे त्याच्या शोधात ती पाकिस्तानात आली.

पाकिस्तानात पोहोचल्यावर कॅरिस्टिनाने मुलतानमधील एका हॉटेलमध्ये रूम घेतली आणि आपल्या मित्राला फोन करायला सुरुवात केली, पण त्याचा फोन सतत बंद येत होता. यापूर्वी रशियन तरुणीला गुलगश्त कॉलनीतील हॉटेलने रुम देण्यास नकार दर्शविला होता. हॉटेल मॅनेजरने तिच्याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिची महिला केंद्रात राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, दोन दिवसांनी तिला अब्दाली रोडवरील हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली.

तरुणीला रशियन दूतावासात पाठवले
ननकाना साहिबमध्ये (Nankana Sahib) राहणाऱ्या तिच्या प्रियकराला भेटायला आल्याचे कॅरिस्टिनाने पोलिसांना सांगितले, मात्र पोलिसांनी तिला शहराबाहेर जाऊ दिले नाही. कारण कॅरिस्टिनाने प्रियकराचा फोन सतत बंद येत होता आणि तिच्याकडे पुरेसे पेपरही नव्हते. प्रियकराची भेट न झाल्याच्या दु:खाने आणि पोलिसांच्या कारवाईला कंटाळून तरुणीने हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली. यानंतर किरकोळ जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर पोलिसांनी मुलीला इस्लामाबादमधील रशियन दूतावासात पाठवले आहे.
 

Web Title: Russian woman's suicide bid after failure to meet friend in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.