ऐकाव ते नवलंच, सलून उत्तम चालावं म्हणून मानवी कवट्यांवर तंत्रमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 06:24 PM2019-03-19T18:24:46+5:302019-03-19T18:27:46+5:30

कळव्यात मांत्रिकासह तिघांना अटक  

To Run salon in profit; blackmagic on skull; accused arrested | ऐकाव ते नवलंच, सलून उत्तम चालावं म्हणून मानवी कवट्यांवर तंत्रमंत्र

ऐकाव ते नवलंच, सलून उत्तम चालावं म्हणून मानवी कवट्यांवर तंत्रमंत्र

Next
ठळक मुद्देकळव्यातील मफतलाल झोपडपट्टीत राहणाऱ्या शर्माने काही महिन्यांपूर्वी सलून सुरू केले आहे.कळव्यात नव्याने सुरू केलेले सलून चालण्यासाठी त्याने मांत्रिक हाटकर याची मदत घेतली. त्यासाठी हाटकर याने सहा हजार रुपये घेतले. एक मानवी कवटी देऊ न त्यासमोर 108 वेळा एक मंत्र बोलण्यास सांगितले.

ठाणे - काही महिन्यांपूर्वी सुरू केलेले सलून चांगले चालावे यासाठी उल्हासनगर येथील मांत्रिकाकडून मानवी कवटय़ांवर तीन महिन्यांपासून घरातच तंत्रमंत्र सुरू असल्याचा प्रकार कळव्यात उघड झाला आहे. याप्रकरणी राजू शर्मा (45) याच्यासह मांत्रिक कैलास हाटकर आणि स्मशानभूमीतून मानवी कवटय़ा काढून देणाऱ्या पांडुरंग गवारी यांना कळवापोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन मानवी कवटय़ा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.

कळव्यातील मफतलाल झोपडपट्टीत राहणाऱ्या शर्माने काही महिन्यांपूर्वी सलून सुरू केले आहे. पूर्वी तो उल्हासनगरमध्ये एका सलूनमध्ये कारागीर म्हणून काम करत होता. तेथे हाटकर याच्याशी त्याची ओळख झाली होती. कळव्यात नव्याने सुरू केलेले सलून चालण्यासाठी त्याने मांत्रिक हाटकर याची मदत घेतली. त्यासाठी हाटकर याने सहा हजार रुपये घेतले. त्याबदल्यात एक मानवी कवटी देऊ न त्यासमोर 108 वेळा एक मंत्र बोलण्यास सांगितले. तीन महिन्यांपासून शर्मा त्याप्रमाणो नियमित मंत्र म्हणत होता. याबाबत, पोलिसांना माहिती मिळताच शर्मा याच्या घराच्या झडतीत त्यांना मानवी कवटी सापडली. चौकशीमध्ये हाटकर आणि गवारी यांनी ही कवटी दिल्याचे दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. हाटकर याच्याकडून आणखी एक कवटी जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आणखी कोणाला कवटी दिली आहे का? याचा तपास कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे करत आहेत. 

Web Title: To Run salon in profit; blackmagic on skull; accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.