Kalyan RTO: कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने आरटीओ कर्मचाऱ्याला एजंटकडून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 11:41 PM2021-12-07T23:41:37+5:302021-12-07T23:42:33+5:30

कल्याण आरटीओ कार्यलयातील घटना. खडकपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणारया एजंट विरोधात तक्रार दाखल 

RTO employee beaten for resisting spitting in office | Kalyan RTO: कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने आरटीओ कर्मचाऱ्याला एजंटकडून मारहाण 

Kalyan RTO: कार्यालयात थुंकण्यास विरोध केल्याने आरटीओ कर्मचाऱ्याला एजंटकडून मारहाण 

Next

कल्याण - कार्यलयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या  आरटीओ लिपिकाला एका एजंट ने मारहाण केल्याची घडली कल्याण आरटीओ कार्यलयात आज सायंकाळच्या सुमारास  घडली आहे .याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मच्छिंद्र केणे या एजंट  विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला एजंट मच्छिंद्र केणे हा कार्यलयातच थुंकला .यामुळे आरटीओत कार्यरत असलेले लिपिक मनीष जाधव यांनी त्याला हटकले  आणि त्याला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले  यामुळे संतापलेल्या केणे याने मनीष यांना धमकी दिली .इतकेच नव्हे तर  संध्याकाळी 6 वाजता कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष याला केणे याने आपल्या साथीदारांसह  बेदम मारहाण केली.

या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे . दरम्यान याप्रकरणी  मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या घटनेचा निषेध केला असून उद्या ठाणे जिल्ह्यातील चारही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा  दिला आहे 

Web Title: RTO employee beaten for resisting spitting in office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.