बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:23 PM2021-06-16T21:23:25+5:302021-06-16T21:24:37+5:30

Rape and Murder : आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली. 

Raped, killed 2 minor girls and hanged; 7 arrested | बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत

बलात्कार करून २ अल्पवयीन मुलींची हत्या करून लटकवले झाडाला; ७ जण अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे“दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्याची उकल झाली आहे. 

गुवाहाटी - आसामच्या कोकराझार जिल्ह्यात झाडावर लटकलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून ठार मारून मृतदेह झाडावर लटकवले होते. आत्महत्येसारखे दिसण्याच्या प्रयत्नात मृतदेह झाडावर टांगण्यात आले होते, अशी माहिती आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती महंता यांनी दिली. 

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी मध्यरात्री अटक केल्याच्या घटनेनंतर काही तासांनंतर महंत यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "आरोपींपैकी तीन आरोपी बलात्कार आणि हत्येमध्ये सामील होते तर इतर चार जणांनी तपासात पुरावे नष्ट केले आणि पोलिसांची दिशाभूल केली." “दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि हत्या या गुन्ह्याची उकल झाली आहे. 

रविवारी गुवाहाटीपासून २०० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकराझार जिल्ह्यातील बोडोलँड टेरिटोरियल प्रांतात मुख्यमंत्री रविवारी १६ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींच्या कुटुंबास भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची ओळख पटवल्याचा दावा केला होता. पण या दोन चुलत बहिणींची हत्या किंवा मृत्यू झाला आहे याची नक्की खात्री पटली नाही.

कुटुंबाची भेट घेतल्यानंतर हिमंता बिस्वा कुमार यांनी सांगितले की, त्याने पोलिसांना सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. “जर त्यांचा खून झाला तर आरोपींना अटक करुन योग्य शिक्षा द्यावी आणि जर ही आत्महत्येची घटना असेल तर बहिणींना हे कृत्य करण्यास कोण कारणीभूत आहेत याची चौकशी झाली पाहिजे, ”असे त्यांनी रविवारी सांगितले. मंगळवारी आसामचे पोलीस महासंचालक भास्करज्योती यांनी सांगितले की, मुलींची हत्या करण्यात आली.

बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी आरोपींमध्ये मुझमिल शेख (२०), फरिझुल रहमान (२२) आणि नसीबुल शेख (१९) आहेत. आमचा या गुन्ह्यात आहे, ”असेही त्यांनी सांगितले.



डीजीपी पुढे म्हणाले की, पोलिसांनी आरोपीच्या मोबाइल फोनवरून डिलीट केलेला डेटा परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सुरुवातीच्या तपासाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांनी रविवारी सांगितले की, पीडित आरोपींना बहुधा ओळखत होत्या असतील आणि गुन्ह्यापूर्वी त्यांच्याशी संपर्क साधला असेल. पोलिसांना अद्याप दोन्ही मुलींचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नाही, असे महंता म्हणाले. मुलींचा व्हिसेरा चाचण्यांसाठी ठेवण्यात आला आहे आणि आरोपी व पीडितांकडून गोळा केलेल्या पुराव्यांची डीएनए फिंगरप्रिंटिंग केली जाईल.

“आम्ही मंगळवारी गुन्हेगारीच्या घटनेचे पुन्हा एकदा क्राईम सीन केला,ज्यावेळी स्वतंत्र साक्षीदार, दंडाधिकारी आणि न्यायवैद्यक तज्ञ उपस्थित होते. मला खात्री आहे की, वैद्यकीय अहवाल आमच्या पुराव्यांशी  जुळतील, ”महंता म्हणाले.

Web Title: Raped, killed 2 minor girls and hanged; 7 arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.