CBI कोर्टाचा मोठा निर्णय, 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:55 PM2021-10-08T12:55:07+5:302021-10-08T12:55:20+5:30

Ranjit Murder Case: रणजीत हत्या प्रकरणात सीबीआय कोर्टाने सुनारिया जेलमध्ये बंद असलेल्या राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. सीबीआयचे विशेष न्यायालय 12 ऑक्टोबर रोजी सर्व दोषींना शिक्षा सुनावणार आहे.

Ram Rahim news, dera head ram rahim convicted in ranjit murder case | CBI कोर्टाचा मोठा निर्णय, 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

CBI कोर्टाचा मोठा निर्णय, 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात राम रहीम दोषी

Next

पंचकुला: हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमला मोठा धक्का बसला आहे. 19 वर्षे जुन्या रणजीत हत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने सुनारिया तुरुंगात बंद असलेल्या राम रहीमसह पाच आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता यावर 12 ऑक्टोबर रोजी सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राम रहीम, कृष्ण लाल, सबदील, अवतार आणि जसबीर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी इंदरसेनचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रणजीत हत्या प्रकरणातील आरोपी डेराप्रमुखी गुरमीत राम रहीम आणि कृष्ण कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाले. त्याचवेळी आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल थेट न्यायालयात हजर होते. सीबीआय कोर्ट यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी या प्रकरणी निकाल देणार होता. पण, काही कारणास्तव निकाल राखून ठेवला. 19 वर्षे जुन्या या प्रकरणाची अखेरची सुनावणी 12 ऑगस्ट रोजी झाली होती. सीबीआय न्यायाधीश डॉ.सुशील कुमार गर्ग यांच्या न्यायालयात सुमारे अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपींना दोषी ठरवलं

काय आहे संपूर्ण प्रकरण

रणजीत सिंह यांची 2002 मध्ये हत्या झाली होती. तो डेरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचा. डेरा व्यवस्थापनाला संशय होता की रणजीत सिंहने साध्वीच्या लैंगिक शोषणाचे निनावी पत्र त्याच्या बहिणीकडून लिहून घेतले आहे. रणजीतच्या हत्येप्रकरणी डेरा प्रमुख राम रहीमला आरोपी बनवण्यात आलं होतं. अनेकदा न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली होती. पण, सीबीआयने 2003 मध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि 2007 मध्ये न्यायालयाने आरोप निश्चित केले. दरम्यान, गुरमीत राम रहीमला साध्वींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 20 वर्षांची आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
 

Web Title: Ram Rahim news, dera head ram rahim convicted in ranjit murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.