Raj Kundra : मढ़च्या बंगल्यात पोलिसांनी टाकली पहिली धाड अन् राज कुंद्राची उलगडली मोडस ऑपरेंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:25 PM2021-07-20T20:25:26+5:302021-07-20T20:26:55+5:30

Raj kundra : प्रदीप बक्षी हा कुंद्राचा नातेवाईक असून केनरिन प्रा. लि. कंपनीद्वारे चालवली जात होती. राज कुंद्राने आर्म्स प्राईम मीडिया प्रा. लि. कंपनी स्थापन करून केरीन प्रा. लि. कंपनीसाठी हॉटशॉट्स हे ऍप विकसित केले. मात्र, या प्रकरणानंतर मुंबईत खळबळ माजली आहे.

Raj kundra : The first raid was carried out by the police in Madh's bungalow and bursted modus oprendi | Raj Kundra : मढ़च्या बंगल्यात पोलिसांनी टाकली पहिली धाड अन् राज कुंद्राची उलगडली मोडस ऑपरेंडी

Raj Kundra : मढ़च्या बंगल्यात पोलिसांनी टाकली पहिली धाड अन् राज कुंद्राची उलगडली मोडस ऑपरेंडी

Next
ठळक मुद्देमढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश झाला.

मुंबईपोलिसांनी सुतापासून स्वर्ग गाठण्यात यश मिळवले आहे. ४ फेब्रुवारीला गुप्त माहितीच्या आधारे यास्मिन रसूल बेग खान उर्फ रोवा उर्फ यास्मिन खासनवीस आणि तिचे अन्य साथीदारांना मढ येथील भाड्याने घेतलेल्या बंगल्यात अश्लील शूटिंग करताना छापा टाकून आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर काल रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक केली आहे. 

प्रदीप बक्षी हा कुंद्राचा नातेवाईक असून केनरिन प्रा. लि. कंपनीद्वारे चालवली जात होती. राज कुंद्राने आर्म्स प्राईम मीडिया प्रा. लि. कंपनी स्थापन करून केरीन प्रा. लि. कंपनीसाठी हॉटशॉट्स हे ऍप विकसित केले. मात्र, या प्रकरणानंतर मुंबईत खळबळ माजली आहे. मढ परिसरातील एका बंगल्यावर छापा टाकल्यानंतर अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेने राज कुंद्राला अटक केल्यानंतर आज सायंकाळी गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कशा पद्धतीने या अश्लील चित्रफिती शूट केल्या जायच्या आणि विकल्या जायच्या, याबाबत मोडस ऑपरेंडी भारंबे यांनी सांगितली आहे.

वेब्सिरीज, चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून नवोदित महिला कलाकारांना एखाद्या शॉर्ट स्टोरीजमध्ये ब्रेक देतो असं सांगून बोलावलं जात असे. ऑडिशन, शॉट्स घेण्यासाठी बोलावलं जायचं. त्यात बोल्ड सीन्स करावे लागतील अशी बतावणी केली जात असे. नंतर त्या बोल्ड सीन्सचं पर्यवसान सेमी न्यूड आणि न्यूड सीन्समध्ये केलं जात होतं. त्यावर या महिला कलाकार आक्षेप घ्यायच्या. अशा काही महिला कलाकार गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यास आल्या. त्यांच्या तक्रारींवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला.

छोट्या क्लिप्स, शॉर्ट फिल्म्स काही अश्लील वेबसाईट्स आणि मोबाईल ऍप्सला विकल्या जात होत्या. यात ९ आरोपींना अटक केली होती. त्यात रोहा खान, गेहेना वशिष्ट, तन्वीर हाशमी, उमेश कामत आणि इतरही काही आरोपी असून त्यांना जामीन मिळाला आहे. यातले काही प्रोड्युसर देखील आहेत. त्यांचे वेगवेगळे ऍप्स आणि वेबसाईट आहेत. तिथे या क्लिप्स विकल्या जायच्या. नंतर राज कुंद्रा आणि प्रदीप बक्षी यांनी स्वतःच्या ऍपद्वारे सबस्क्रिप्शन देऊन लाखो रुपये कमवले. या ऍपवर देखील अश्लील फिल्म्स टाकल्या जात. 

 

Web Title: Raj kundra : The first raid was carried out by the police in Madh's bungalow and bursted modus oprendi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.