देहविक्री करणाऱ्या भिवंडीत लॉजवर छापा, तीन बळीत महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 08:15 PM2020-10-27T20:15:27+5:302020-10-27T20:16:02+5:30

Raid on Sex Racket : छापा मारून कारवाई करीत तीन बळीत महिलांची सुटका केली असून दोन दलालां विरोधात गुुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

Raid on Bhiwandi lodge for prostitution, release of three women victims | देहविक्री करणाऱ्या भिवंडीत लॉजवर छापा, तीन बळीत महिलांची सुटका

देहविक्री करणाऱ्या भिवंडीत लॉजवर छापा, तीन बळीत महिलांची सुटका

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दलालांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

भिवंडी - भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर रांजनोली नाका व भिवंडी कल्याण रोड या परिसरात कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर लॉजिंग व्यवसाय फोफावला असून या परिसरातील शेर ए पंजाब लॉज वर ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने मंगळवारी छापा मारून कारवाई करीत तीन बळीत महिलांची सुटका केली असून दोन दलालां विरोधात गुुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.
           

सरवली ग्रामपंचायत हद्दीत शेर ए पंजाब बार अँड लॉज असून या ठिकाणी महिलांकडून अनैतिक शारीरिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी तस्करी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली असता तेथील महिला पुरविणाऱ्या दलालांशी संपर्क साधून महिला पुरविण्याची मागणी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून केली असता मंगळवारी दोन दलाल तीन बळीत महिलांना घेऊन त्या ठिकाणी आले असता पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल मदने ,पोलीस उप निरीक्षक चव्हाणके ,पो हवा बाबरेकर , हवाळ, सोनवणे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघा दलालांना रंगेहात पकडले असून त्यांच्या तावडीतून तीन बळीत महिलांची सुटका केली असून दोन दलालांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बळीत महिलांची रवानगी महिला सुधारगृहात केली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

Web Title: Raid on Bhiwandi lodge for prostitution, release of three women victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.