घोटाळेबाजांची तिमाही! सरकारी बँकांत तब्बल १९ हजार कोटींचे घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 06:05 AM2020-09-23T06:05:36+5:302020-09-23T06:10:02+5:30

१२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये २,०५० घोटाळे झाले. त्यात २,३२५.८८ कोटी रुपये अडकले.

Quarter of scammers! 19,000 crore scams in government banks | घोटाळेबाजांची तिमाही! सरकारी बँकांत तब्बल १९ हजार कोटींचे घोटाळे

घोटाळेबाजांची तिमाही! सरकारी बँकांत तब्बल १९ हजार कोटींचे घोटाळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांच्या काळात सरकारी मालकीच्या बँकांत तब्बल १९,९६४ कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील सर्वाधिक घोटाळे स्टेट बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ इंडिया या बँकांत झाले आहेत.


माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जावर रिझर्व्ह बँकेने अधिकृतरीत्या ही माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, एप्रिल-जून २०२० या तिमाहीत देशातील सरकारी बँकांत घोटाळ्यांची २,८६७ प्रकरणे समोर आली. त्यात १९,९६४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. घोटाळ्याच्या सर्वाधिक घटना एसबीआयमध्ये घडल्या. मात्र, घोटाळ्यातील रकमेच्या बाबतीत बीओआय प्रथम स्थानी आहे. पंजाब नॅशनल  बँक आणि युनियन बँक आॅफ इंडियामध्ये सर्वांत कमी घोटाळे झाले. पंजाब नॅशनल बँकेत घोटाळ्याच्या २४० घटना घडल्या आहेत. मात्र, घोटाळ्यातील रक्कम २७०.६५ कोटी रुपये आहे. युनियन बँक आॅफ इंडियात ४९ प्रकरणांत ४६.५२ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.

आरबीआयने काय म्हटले?
च्रिझर्व्ह बँकेने म्हटले की, १२ सरकारी बँकांपैकी एसबीआयमध्ये २,०५० घोटाळे झाले. त्यात २,३२५.८८ कोटी रुपये अडकले. बीओआयमध्ये ४७ प्रकरणांत ५,१२४.८७ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. कॅनरा बँकेतील ३३ प्रकरणांत ३,८८५.२६ कोटींचे, तर बँक आॅफ बडोदामध्ये ६० प्रकरणांत २,८४२.९४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. इंडियन बँकेतील ४५ प्रकरणांत १,४६९.७९ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.

च्इंडियन ओव्हरसीज बँकेत ३७ प्रकरणांत १,२०७.६५ कोटी रुपयांचे, तर बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ९ प्रकरणांत १,१४०.३७ कोटी रुपयांचे घोटाळे झाले. युको बँकेत १३० प्रकरणांत ८३१.३५ कोटी रुपयांचे, तर सेंट्रल बँक आॅफ इंडियात १४९ प्रकरणांत ६५५.८४ कोटी रुपयांचे घोटाळे झाले.

Web Title: Quarter of scammers! 19,000 crore scams in government banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.