पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सराईत गुंडास शस्त्रासह अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 12:25 PM2021-01-10T12:25:54+5:302021-01-10T12:26:28+5:30

Crime News : तेथे त्यांना एक पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन हा कमरेला गावठी पिस्तुल लावून परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या ऊरुळी कांचन येथील कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे.

Pune police arrested gangster who was in for trying to escape | पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सराईत गुंडास शस्त्रासह अटक

पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सराईत गुंडास शस्त्रासह अटक

Next

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ऊरुळी कांचन येथून एका सराईताकडून एक गावठी कट्टा व काडतुस जप्त केले आहे. 

            
माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय ३४, रा.ऊरुळी कांचन ता.हवेली.) याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणूक पार्श्श्वभूमीवर पुणे जिल्हयात कोबींग ऑपरेशन राबविले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती. शनिवार ( ९ जाानेवारी ) रोजी रात्री १० - ३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विद्याधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांचे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ऊरुळी कांचन इलाईट चौक येथे आले होते.

             तेथे त्यांना एक पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन हा कमरेला गावठी पिस्तुल लावून परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या ऊरुळी कांचन येथील कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे. अशी बातमी मिळाली. या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून संशयास्पद रित्या मिळून आलेला व पळून जाण्याचे तयारीत असलेल्या सोमनाथ कांचन यांस ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आले. 

       
सदर मुद्देमाल जप्त करून त्यास पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सोमनाथ कांचन याने सदर गावठी पिस्तुल  कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत. सोमनाथ कांचन याची ऊरुळी कांचन परिसरात दहशत असून बऱ्याच लोकांना तो दमदाटी व मारहाण सुद्धा करायचा. परंतू तो स्थानिक असल्याने व त्याच्या भीतीने लोक पोलीसात तक्रार देण्यास धजावत नसत. काही राजकीय पुढारी निवडणूकीसाठी त्याचा वापर करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Pune police arrested gangster who was in for trying to escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.