‘माझ्यावर तुझं किती प्रेम आहे ते सिद्ध कर’, माथेफिरू पतीने पत्नीला सांगितले आणि तिच्या तोंडात ओतली विषाची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:47 AM2021-11-30T11:47:40+5:302021-11-30T11:47:58+5:30

crime News: छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कीटकनाशक प्राशन करायला लावले.

‘Prove how much you love me’, Mathefiru told his wife and poured a bottle of poison into her mouth. | ‘माझ्यावर तुझं किती प्रेम आहे ते सिद्ध कर’, माथेफिरू पतीने पत्नीला सांगितले आणि तिच्या तोंडात ओतली विषाची बाटली

‘माझ्यावर तुझं किती प्रेम आहे ते सिद्ध कर’, माथेफिरू पतीने पत्नीला सांगितले आणि तिच्या तोंडात ओतली विषाची बाटली

Next

रायपूर - छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कीटकनाशक प्राशन करायला लावले. या महिलेला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पतीने पत्नीला विचारले की, ती त्याच्यावर किती प्रेम करते त्यानंतर पत्नीने मी तुमच्यावर खूप प्रेम करते म्हणून सांगितले. तेव्हा पतीने पत्नीकडे पुरावा मागितला. तेव्हा पत्नीने विचारले की कुठला पुरावा पाहिजे. पत्नीचे हे बोलणे ऐकल्यावर पतीने तिचे तोंड पकडून तिला कीटकनाशक पाजले.

ही घटना २५ नोव्हेंबरची आहे. त्या दिवशी महिला घरात जेवण बनवत होती. तेव्हा तिचा पती यशवंत टंडन बाहेरून फिरून घरात आला. घरी येताच तो पत्नी उमाला म्हणाला की, तू माझ्यावर किती प्रेम करतेस आणि ते तुला सिद्ध करावे लागेल. त्यानंतर यशवंत उमा हिला खोलीत घेऊन गेला आणि त्याने कीटकनाशकाचे औषध उमाच्या तोंडात टाकले. यादरम्यान, घरामध्ये कुणीही उपस्थित नव्हते.

घराच्या आजूबाजूचे लोक जेव्हा उमाच्या घरात आले तेव्हा त्यांना सारे काही समजले. तिला त्वरित रुग्णालयात घेऊन गेले. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची स्थिती गंभीर आहे. या महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.  

Web Title: ‘Prove how much you love me’, Mathefiru told his wife and poured a bottle of poison into her mouth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.