The prostitution started under the name of massage parlour | मसाज देण्याच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय
मसाज देण्याच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय

ठळक मुद्देमोबाईल आणि वृत्तपत्रातून दिल्या जायच्या जाहिरातयाप्रकरणी रजनीश सिंग नामक इसमाला अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

मुंबई - मसाज देण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळी प्रमुखाच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने सोमवारी आवळल्या. ही टोळी मोबाईल आणि वर्तमानपत्रात 'स्पा @ युअर होम' अशी जाहिरात देऊन हा व्यवसाय चालवत होती. साकिनाक्यातील पेनिनसुला ग्रँड हॉटेल आणि लोअर परळच्या रजनीश वेलनेस लिमिटेड या ठिकाणी पोलिसांनीधाड टाकल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रजनीश सिंग नामक इसमाला अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.


Web Title: The prostitution started under the name of massage parlour
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.