विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 02:38 PM2019-08-24T14:38:04+5:302019-08-24T14:42:50+5:30

अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनीच्या पालकांना व पोलिसांना कळविण्यात आले.

Principal suspended for failing to take action in molestation case | विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित

विनयभंगाच्या घटनेवर कारवाई न केल्याने प्राचार्य निलंबित

Next
ठळक मुद्देकॉलेजबाहेरील तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्याचे निलंबन केले.

मुंबई - महाविद्यालयात असतानाच तरुणीशी अश्लील चाळे करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालत प्राचार्यानीच पीडितेला तब्बल ३ तास वर्गखोलीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कामोठे येथील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात घडला. पीडित विद्यार्थिनीची तक्रार गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांत दाखल झाल्यानंतर शुक्रवारी संतप्त विद्यार्थ्यांच्या जमावाने महाविद्यालयात आंदोलन करून महाविद्यालयीन प्रशासनाला प्राचार्याची पदावरून हाकलपट्टी करण्याची मागणी केली. विद्यार्थी संघटनांनीही यामध्ये उडी घेतल्याने अखेर कॉलेज प्रशासनाने प्राचार्याचे निलंबन केले.
कामोठेमधील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी एक विद्यार्थिनी झेरॉक्स काढण्यासाठी गेली असता तेथे उभ्या असलेल्या कॉलेजबाहेरील तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने तातडीने हा प्रकार महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष नारायण खेडेकर यांना सांगितला. परंतु प्राचार्यानी तरुणावर कारवाई करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्यासाठी व पीडित मुलीने गुन्हा दाखल करू नये यासाठी तिला एका वर्गामध्ये डांबून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. दोषी तरुणावर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थिनीला डांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत गोंधळ घातला. अखेर महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थिनीच्या पालकांना व पोलिसांना कळविण्यात आले. मात्र त्यानंतरही तरुणावर कोणतीही कारवाई न झाल्याने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले. सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी हा प्रकार कळताच गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्या प्राचार्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

 

यापुढेही महाविद्यालयांत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक यंत्रणा रुजू ठेवण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनीही पोलीस गस्त सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. - अ‍ॅड़ वैभव थोरात, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

Web Title: Principal suspended for failing to take action in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.