श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्किटं; परमबीर सिंगांविरोधात पोलीस निरीक्षकाचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 08:55 PM2021-04-26T20:55:13+5:302021-04-26T20:56:20+5:30

Cooruption Against IPS Parambir Singh : आधीच चौकशीच्या जाळ्यात अडकलेल्या सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

Pressure to leave the rich, gold biscuits on Diwali; Serious allegations of police inspector against Parambir Singh | श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्किटं; परमबीर सिंगांविरोधात पोलीस निरीक्षकाचे गंभीर आरोप

श्रीमंतांना सोडण्यासाठी दबाव, दिवाळीत सोन्याची बिस्किटं; परमबीर सिंगांविरोधात पोलीस निरीक्षकाचे गंभीर आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देपरमबीर सिंग हे १७ मार्च २०१५ ते  ३१ जुलै २०१८ या काळात ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठबळ देऊन भष्टाचार केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी केला

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट करून पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी खळबळ उडवली असतानाच, आता आणखी एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचलाकांकडे १४ पानी तक्रार दाखल केली आहे. यात परमबीर सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे आधीच चौकशीच्या जाळ्यात अडकलेल्या सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंग हे १७ मार्च २०१५ ते  ३१ जुलै २०१८ या काळात ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारांना पाठबळ देऊन भष्टाचार केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक भीमराज उर्फ भीमराव घाडगे यांनी केला आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना, परमबीर सिंग यांनी आपल्यावर अनेक श्रीमंत गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी दबाव आणला होता, त्यांचं न ऐकल्याची शिक्षा म्हणून आपल्याला अनेक गुन्ह्यात अडकवून अडचणीत आणलं होतं, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं आहे. सध्या घाडगे अकोला नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

परमबीर यांचे अंडरवर्ल्डची संबंध असल्याचा पोलीस अनुप डांगेंनी केला आरोप; डीजी संजय पांडे करणार चौकशी

 

Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

 

या पत्रात घाडगे यांनी परमबीर सिंग हे दिवाळीला भेट म्हणून प्रत्येक झोनचे डिसीपीकडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहाय्य्क पोलीस आयुक्त यांच्याकडून प्रत्येकी २० ते ३० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याचे बिस्कीटे घेतली आहेत.  सिंग यांनी त्यांची पत्नी सौ. सविता हिचे नावाने खेतान ॲन्ड कंपनी ही उघडली असुन कार्यालय इंडिया बुल इमारत, ६ वा मजला, लोअर परेल, मुंबई येथे आहे तसेच त्या इंडिया बुल या कंपनीचे संचालक आहेत इंडिया बुलमध्ये सुमारे रू.५०००/–करोडची गुंतवणूक केली असल्याची गोपनीय माहिती मिळालेली आहे.१६) मा परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर असतांना त्यांनी त्यांची पत्नी सौ सविता यांना वापरण्यासाठी सरकारी वाहन नं. एम. एच. ०१- ए. एन १४१५ होंडा सिटी ही कार दररोज मलबार हिल, मुंबई ते इंडिया बुल इमारत, लोअर परेल, मुंबई येथे व इतरत्र दररोज केला जात होता. सदर कारवर सरकारी वाहन चालकाचा वापर केला जात होता. त्याबाबत मी शासनाकडे तक्रार केली आहे. तसेच सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर असतांना ते पोलीस अधिकाऱ्याचे बदल्यात भ्रष्टाचार करत असल्याने सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे सुरू होते त्याचे दरमहा करोड़ रूपये हे सिंग हे त्यांचे हस्तकामार्फत मिळवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 

त्याचप्रमाणे सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे यापदी नेमणुक होण्यापूर्वी ते पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ३, कल्याण येथे नेमणुकीस असलेपासुन ते  प्रकाश मुथा रा. कल्याण यांना चांगलेप्रकारे ओळखत असुन ते त्यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फतीने रिव्हॉल्व्हर लायसन्सचे कामाचे १० ते १५ लाख रूपये घेवुन लायसन्स दिले जात होते. तसेच बिल्डर लोकांचे कामे त्यांच्यामार्फतीने होवुन त्यामध्ये करोडो रूपयाची देवाण घेवाण सेंटलमेंन्ट करून केली जात होती. जो पोलीस अधिकारी त्याचे बेकायदेशीर ऐकत नसे त्याचेविरूध्द खोटे गुन्हे दाखल केले जायचे किंवा त्यांची बदली हे नियंत्रण कक्ष येथे केली जात होती त्यामध्ये उदा. पोनि कदम याची बदली मानपाडा पो.स्टे ते ठाणे नियत्रंण कक्ष अशी करण्यात आली होती. तसेच माझे विरूध्द ५ खोटे गुन्हे नोंदविले होते. सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते. त्यांचेकडे बदल्यातील भष्टाचाराच्या रक्कमा जमा केलेनंतर बदल्या केल्या जात होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नेमणुक करताना सुमारे १ करोड ते ५० लाख रूपये घेतल्याशिवाय बदल्या केल्या जात नव्हत्या.  सिंग यांनी माझ्याकडे तपासास असलेल्या गुन्हयातील गर्भश्रीमंत आरोपीचे नावे गुन्हयातुन काढून टाकण्याचे बेकायदेशीर आदेश दिले ते मी न ऐकल्याने त्यांनी माझेविरूध्द खोटे गुन्हे नोंदविल्यानंतर मला निलंबित केलेनंतर माझेकडील तपासास असलेल्या गुन्हयातुन गर्भश्रीमत आरोपीचे काढून टाकण्यात आली व काही गुन्हे क समरी करण्यात आले त्यामध्ये सुमारे रू २००/- करोडचा भ्रष्टाचार झालेला आहे.   

 

पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना दोन शासकीय निवासस्थानांचा बेकायदेशीरपणे वापर करीत होते. याबाबत, मी तक्रार केल्यानंतर त्यांनी एकूण २९,४३,८२५/- एवढी रक्कम भरणा केली आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे सिद्ध झालेले आहे असे आरोप पत्रात केले आहेत. तसेच पुढे म्हटले आहे की,  परमबीर सिंग पोलीस आयुक्त असताना त्यांना फक्त दोन कुक व एक टेलिफोन ऑपरेटर ठेवण्याची परवानगी होती. मात्र, ते ठाणे येथील निवासस्थानी एस.आर.पी.एफ.चे ६ पोलीस कर्मचारी आणि ठाणे येथील नेमणुकीतील १४ पोलीस कर्मचारी सेवेसाठी वापरत होते. तसेच मुंबई येथील निवासस्थानी त्यांचे कुटुंबाकरिता एस. आर. पी. एफ. चे १० पोलीस कर्मचारी आणि ३ वाहन चालक पोलीस हवालदार पठारे आणि पोलीस हवालदार पाटील असे बेकायदेशीरपणे वापरून त्यांनी पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करून भष्टाचार केलेला आहे. परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर व अन्य कोणत्याही ठिकाणी नेमणुकीस असताना त्यांच्यासोबत पोलीस हवालदार फ्रान्सीस डिसिल्वा आणि पोलीस हवालदार प्रशांत पाटील असे दोन जण गेले २० वर्षांपासून त्यांच्यासोबत दिवस-रात्र खासगी व्यवहारासाठी व बदल्यामधील भ्रष्टाचाराच्या रक्कमेची देवाण-घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

Web Title: Pressure to leave the rich, gold biscuits on Diwali; Serious allegations of police inspector against Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.