प्रफुल्ल पटेलांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता; ईडी लवकरच नोटीस पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:58 PM2019-10-14T21:58:30+5:302019-10-14T22:01:29+5:30

इकबाल मिर्ची मालमत्ता घोटाळा

Praful Patel likely to be re-inquiry; ED will send notice shortly | प्रफुल्ल पटेलांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता; ईडी लवकरच नोटीस पाठविणार

प्रफुल्ल पटेलांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता; ईडी लवकरच नोटीस पाठविणार

Next
ठळक मुद्देमृत गँगस्टर इकबाल मिर्ची यांच्या मालमत्ता विक्री प्रकरणात त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक पटेल यांना या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे पक्षाच्यावतीने वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

मुंबई -  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी) मुंबई विभागाकडून लवकरच आणखी एका राजकीय नेत्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना चौकशीला हजर रहाण्याबाबत समन्स बजाविण्यात येणार आहे. मृत गँगस्टर इकबाल मिर्ची यांच्या मालमत्ता विक्री प्रकरणात त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे ईडीतील सुत्रांकडून सांगण्यात आले.

मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून पुढे आली आहे. विधानसभा निवडणूकीनंतर पटेल यांना चौकशीसाठी पाचारण केले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या प्रकरणाचा इन्कार करीत जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप केला आहे.मिर्चीच्या मुंबईतील कोट्यावधीच्या मालमत्तेच्या विक्रीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने दिल्लीतून रणजित सिंग बिंद्रा व हारुण अलीम युसूफ यांना शुक्रवारी अटक केली आहे. त्याच्याकडील चौकशीतून दाऊद इब्राहिमच्या देशातील व ब्रिटनमधील संपत्तीबाबतची महत्वपूर्ण माहिती मिळाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या इकबाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सीजे हाऊसच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. २००७ मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल, लवकरच त्यांना समन्स पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राजकीय द्वेषापोटी जाणीवपूर्वक पटेल यांना या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचे पक्षाच्यावतीने वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

Web Title: Praful Patel likely to be re-inquiry; ED will send notice shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.