पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:38 PM2019-08-15T14:38:06+5:302019-08-15T14:39:41+5:30

काल दुपारी १२.३० दरम्यान हिंदू - मुस्लिम महिलांनी आणि बांधवांनी हा सोहळा साजरा केला.

Police Unique activities; Hindu - Muslim unity Raksha Bandhan ceremony | पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा 

पोलिसांचा अनोखा उपक्रम; हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा 

Next
ठळक मुद्दे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू - मुस्लिम स्त्री - पुरुष या सोहळ्यात सामील झाले होते.  पोलिसांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपक्रम हाती घेत हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा साजरा केला आहे.

मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आरएके (रफी अहमद किडवई) मार्ग पोलिसांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपक्रम हाती घेत हिंदू - मुस्लिम ऐक्य रक्षाबंधन सोहळा साजरा केला आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू - मुस्लिम स्त्री - पुरुष या सोहळ्यात सामील झाले होते. काल दुपारी १२.३० दरम्यान हिंदू - मुस्लिम महिलांनी आणि बांधवांनी हा सोहळा साजरा केला. यावेळी हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम महिलांनी हिंदू बांधवांना राखी बांधली. हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना वाढीस लागावी आणि येऊ घातलेल्या सण - उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं आरएके मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी माहिती दिली. 

Web Title: Police Unique activities; Hindu - Muslim unity Raksha Bandhan ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.