ऐरोलीतून अडीच लाखांचे सिगारेट जप्त, पोलिसांची दोघांवर कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:36 AM2020-05-28T11:36:11+5:302020-05-28T14:12:12+5:30

याप्रकरणी कारमधील दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विक्रीसाठी आणलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सिगारेट व वापरलेली कार असा सहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Police seize 2.5 lakh cigarettes from Airoli in Navi Mumbai rkp | ऐरोलीतून अडीच लाखांचे सिगारेट जप्त, पोलिसांची दोघांवर कारवाई 

ऐरोलीतून अडीच लाखांचे सिगारेट जप्त, पोलिसांची दोघांवर कारवाई 

Next
ठळक मुद्देऐरोली सेक्टर 3 येथे बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याठिकाणी लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असतानाही अवैधरित्या विक्रीसाठी सिगारेटचा माल येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक अमित शेलार यांना मिळाली होती.

नवी मुंबई : ऐरोली येथून अडीच लाखाचे सिगारेट जप्त करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे सिगारेटचा माल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयित कारची झडती घेतली असता हा प्रकार उघड झाला.

ऐरोली सेक्टर 3 येथे बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याठिकाणी लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असतानाही अवैधरित्या विक्रीसाठी सिगारेटचा माल येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक अमित शेलार यांना मिळाली होती. यानुसार, वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे, निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेलार, अतिश कदम, किरण राऊत, दर्शन कटके यांच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी संशयित कारची झडती घेतली असता त्यामध्ये अडीच लाख रुपये किमतीचे सिगारेट आढळून आले. 

याप्रकरणी कारमधील दोघांवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विक्रीसाठी आणलेले अडीच लाख रुपये किंमतीचे सिगारेट व वापरलेली कार असा सहा लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी बातम्या...

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज

Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर 

हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा

धक्कादायक! पॅरोलवर सुटल्यानंतर काही तासांत आरोपीचा खून

Web Title: Police seize 2.5 lakh cigarettes from Airoli in Navi Mumbai rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.