पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:43 PM2019-07-23T12:43:25+5:302019-07-23T13:35:55+5:30

पाचव्या मजल्यावर चढून एका आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असलेल्या भास्कर बिल्डिंग येथे घडली.

Police rescued the girl, who climbed to the fifth floor and attempted suicide | पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले 

पाचव्या मजल्यावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवले 

Next

ठाणे - पाचव्या मजल्यावर चढून एका आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असलेल्या भास्कर बिल्डिंग येथे घडली. मात्र पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवले.  

दरम्यान, या तरुणीचे नाव प्रीती त्रिदेव केणे असून, ती कल्याणजवळील आंबिवली येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी तिने कोर्ट नाका परिसरात असलेल्या भास्कर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाने मोठ्या हिमतीने तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. या बचावकार्यात एपीआय विश्वास जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

ठाण्यातील बचाव कार्याचा व्हिडीओ 

Web Title: Police rescued the girl, who climbed to the fifth floor and attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.