नागपुरातील पोलीस हवालदाराची आत्मदहनाची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:25 PM2020-01-27T23:25:04+5:302020-01-27T23:26:06+5:30

पोलीस मुख्यालयात बदली झाली म्हणून दुखावलेल्या एका पोलीस हवालदाराने चक्क आत्मदहनाचा धमकीवजा इशारा वरिष्ठांना दिला आहे. त्याच्या या इशारावजा धमकीने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Police Head Constable in Nagpur threatens suicide | नागपुरातील पोलीस हवालदाराची आत्मदहनाची धमकी

नागपुरातील पोलीस हवालदाराची आत्मदहनाची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इशाारा पत्र’ व्हायरल : पोलीस दलात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस मुख्यालयात बदली झाली म्हणून दुखावलेल्या एका पोलीस हवालदाराने चक्क आत्मदहनाचा धमकीवजा इशारा वरिष्ठांना दिला आहे. संदीप शरद गुंडलवार (वय ५२) असे त्याचे नाव आहे. त्याच्या या इशारावजा धमकीने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.
अयोध्यानगरात राहणारा गुंडलवार हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत (डीबी पार्टी) कार्यरत होता. या भागात गुन्हेगारी वाढल्याने वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेत हुडकेश्वर तसेच सक्करदरा पोलीस ठाण्यातील डीबी पथके शनिवारी बरखास्त केली. निष्क्रियतेचा ठपका ठेवून दोन्ही डीबी पार्टीतील २० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या मुख्यालयात केल्या. त्या २० पोलिसांमध्ये गुंडलवारचेही नाव आहे. हे बदली प्रकरण गुंडलवारने भलतेच मनावर घेतले आहे. तडकाफडकी करण्यात आलेल्या या बदलीमुळे आपण खूप दुखावलो आहे, असे सांगून त्याने दोन पानाचा अर्जच हुडकेश्वर ठाणेदाराच्या नावे लिहिला. २६ जानेवारीला तो पोलीस ठाण्याच्या ड्युटी अधिकाऱ्याला हा अर्ज देऊन त्याची प्रत गुंडलवारने मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्तांसह खात्यातील वरिष्ठांना पाठविल्या. आपण १९९१ ला पोलीस दलात रुजू झालो, स्वत:ला कर्तव्यदक्ष आणि सक्षम पोलीस म्हणवून घेत गुंडलवारने एक लुटमारीचा गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठांनी अश प्रकारे तडकाफडकी बदली करणे, अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. आपल्याला ते अन्यायकारक वाटत असल्याचे सांगून त्यामुळेच आपण २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याचेही अर्जात नमूद केले आहे. त्याच्या या अर्जाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

गुंडलवारचे सवाल!
या धमकीवजा इशारा पत्रात हवालदार गुंडलवारने अनेक प्रश्न केले आहेत. कोणत्याही गुन्ह्याला केवळ डीबी पार्टीतीलच पोलीस जबाबदार कसे, ज्या भागात गुन्हा घडला त्या भागातील पोलीस चौकीतील मंडळी, गस्त करणारे पथक, बीट मार्शल, ड्युटी अधिकारी आणि संबंधित ठाणेदार यांची काही जबाबदारी नाही का, असाही प्रश्न गुंडलवारने विचारला आहे.

Web Title: Police Head Constable in Nagpur threatens suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.