Police has returned jewellery bag of teacher | शिक्षिकेच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत

शिक्षिकेच्या दागिन्यांची बॅग पोलिसांनी केली परत

ठळक मुद्दे त्या कांदिवलीत राहत असून भाऊबीजेनिमित्त चारकोपमध्ये राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. एका रिक्षाचालकाला बॅग सापडली असून तो त्याच्या मालकाला शोधत असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली.

मुंबई - शिक्षिकेला रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी परत मिळवून दिली. त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल होता. प्रीती भंडारी (२६) असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या कांदिवलीत राहत असून भाऊबीजेनिमित्त चारकोपमध्ये राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परतत असताना त्यांची दागिने आणि पैशांची बॅग रिक्षातच विसरल्या.

ही बाब घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा मेसेज सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. या दरम्यान एका रिक्षाचालकाला बॅग सापडली असून तो त्याच्या मालकाला शोधत असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार दिपक कुमार साहू या चालकाला शोधून ती बॅग ताब्यात घेतली.

 

Web Title: Police has returned jewellery bag of teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.