PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 06:54 PM2020-02-24T18:54:27+5:302020-02-24T19:03:32+5:30

PNB Bank : नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

PNB Bank : Auction of property of scammer Nirav Modi will be held on this day | PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव

PNB Scam : घोटाळेबाज नीरव मोदीच्या संपत्तीचा 'या' दिवशी होणार लिलाव

Next
ठळक मुद्दे हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईलतर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल.

मुंबई - बहुचर्चित पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या ईडीने जप्त केलेल्या महागड्या कार आणि वस्तूंचा २७ फेब्रुवारी आणि ३, ४  मार्चला लिलाव होणार आहे. नामांकित चित्रकारांच्या कलाकृती हे या लिलावाचे खास आकर्षण ठरू शकते. कोट्यावधी रुपयांच्या या कलाकृती ईडीकडून (अंमलबजावणी संचालनालय) लिलावात काढल्या आहेत. नुकतीच ‘ईडी’च्यावतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल. हा लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात होणार आहे.

कोणाची आहेत महागडी चित्रं ?

* शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’

* एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२

 * व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे


ईडीने जप्त केलेल्या या मालमत्तेचा आता न्यायालयाच्या परवानगीने लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. या लिलावात अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकले जाईल, असा अंदाज सॅफ्रनआर्ट संस्थेने व्यक्त केला आहे. एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२’ या चित्राचाही तितक्याच किमतीला लिलाव होईल. त्याखालोखाल व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे लिलावात असतील.


खास आकर्षण
आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळं

रोल्स रॉईस मोटार




लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन पीएनबीमध्ये झालेल्या ११,३६० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी हा ईडीच्या रडारवर आहे. ईडीने आतापर्यंत नीरवची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्त संपत्तेमध्ये नीरवच्या वरळी आणि अलिबाग येथील फार्महाऊसवर उभ्या होती असलेल्या अलिशान कारचा देखील समावेश आहे. मंगळवारी ईडीने जप्त केलेल्या कार मध्ये रॉल्स रॉईस घोस्ट, पोर्श पनमेरा, मर्सिडिज, फॉर्च्यूनर, इनोव्हा अशा ८६ कोटी रुपयांच्या ८ कारसह काही मौल्यवान दागिने हस्तगत केले आहे. नीरवच्या आजतागायत २९ संपत्ती ईडीने हस्तगत केली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या  हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळांसह आणि रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव करण्यात येणार आहे.

बँकेला ७ हजार ३०० कोटी व्याजासह परत करण्याचे नीरव मोदीला आदेश

 

नीरव मोदीच नव्हे, तर हे पाच जण घोटाळा करून झाले पसार

 

पीएनबी घोटाळा; अखेर नीरव मोदी फरार घोषित

 

PNB Scam : पीएमएलए कोर्टाकडून PNB बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित

Web Title: PNB Bank : Auction of property of scammer Nirav Modi will be held on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.