कळसुबाई अभयारण्यात रानडुकरांची शिकार, शिकारी नाशिक वन्यजीव विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:39 PM2021-05-08T21:39:18+5:302021-05-08T21:41:19+5:30

Pigs hunting in Kalsubai Sanctuary : आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचा संशय; बॅटरी, कोयते, वाघूर जप्त 

Pigs hunting in Kalsubai Sanctuary, hunter in the trap of Nashik Wildlife Department | कळसुबाई अभयारण्यात रानडुकरांची शिकार, शिकारी नाशिक वन्यजीव विभागाच्या जाळ्यात

कळसुबाई अभयारण्यात रानडुकरांची शिकार, शिकारी नाशिक वन्यजीव विभागाच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देरायगड, ठाण्यातील शिकाऱ्यांची टोळी अभयारण्यात रानडुकरांच्या शिकारीत रायगड व ठाणे जिल्ह्यातील शिकाऱ्यांची आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे.संशयित आरोपींना या गुन्हयात ३ ते ७ वर्षाचा कारावास व २५ हजार रु.पर्यंत दंडाची शिक्षा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. जप्त केलेले मांस पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. 

नाशिक : अभयारण्यात विना परवाना प्रवेश करणे वन्यजीव कायद्याने गुन्हा ठरतो तरीदेखील वन्यजीवांच्या शिकारीसाठी अभयारण्य क्षेत्रात घुसखोरी काही शिकऱ्यांकडून केली जाते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या राजुर वनक्षेत्रात रानडुकरांची शिकार करणाऱ्या एका संशयिताला नाशिक वन्यजीव विभागाच्या राजुर-भंडारदरा पथकाने ताब्यात घेतले आहे. हा शिकारी अंतराज्यीय टोळीतील गुन्हेगार असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर वनक्षेत्रात सोमलवाडी शिवारामध्ये रानडुकरांची बंदुकीने शिकार करण्यात आल्याची माहीती वनाधिकाऱ्यांना मिळाली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी तात्काळ राजुर वनक्षेत्रपाल दत्तात्रय पडवळे, अमोल आडे यांची दोन स्वतंत्र पथके कार्यान्वित करून शिकाऱ्यांच्या मागावर धाडली. पथकांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवून मौजे गंभीरवाडी (सोमलवाडी) येथील एका संशयित आरोपीचा माग काढला व त्यास अटक केली. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत स्थानिक संशयित शिकाऱ्याच्या घराची वन्यजीव विभागाच्या पथकाने घेतली असता घरातून अल्युमिनियमच्या भांड्यात दडवून ठेवलेले रानडुकराचे मांस तसेच पाच जाळे, पाच वाघुर, दोन धारधार कोयते, वाघुर लावण्याच्या काठ्या, बॅटरी, लाकडी ठोकळा असे शिकारीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. संशयितास अकोले तालुका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसाची वन कोठडी न्यायाधीशांनी सुनावली. या कारवाईत वनपाल शंकर लांडे, रवींद्र सोनार, राजेन्द्र चव्हाण, सचिन धिंदळे, भास्कर मुठे, वनरक्षक विनोद कोळी, ज्योत्स्ना बेद्रे आदींनी सहभाग घेतला.

 

 रायगड, ठाण्यातील शिकाऱ्यांची टोळी अभयारण्यात रानडुकरांच्या शिकारीत रायगड व ठाणे जिल्ह्यातील शिकाऱ्यांची आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीतील चार संशयितांचा ठावठिकाणा लागला असून पथक त्यांच्या मागावर असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले. लवकर त्यांनाही ताब्यात घेण्यास यश येणार असून वन्यजीव शिकारीचे हे आंतरराज्यीय रॅकेट चा पर्दाफाश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संशयित आरोपींना या गुन्हयात ३ ते ७ वर्षाचा कारावास व २५ हजार रु.पर्यंत दंडाची शिक्षा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. जप्त केलेले मांस पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. 

Web Title: Pigs hunting in Kalsubai Sanctuary, hunter in the trap of Nashik Wildlife Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.