मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना    

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:50 AM2020-10-28T01:50:09+5:302020-10-28T01:51:01+5:30

Crime news : या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले.

Passenger Catch Mobile Thief in Local Train, Incident between Dombivali-Badlapur | मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना    

मोबाइल चोरास प्रवाशांनी दिला चोप, डोंबिवली-बदलापूरदरम्यान घटना    

Next

डोंबिवली - सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा नाही. मात्र, एका चोराने लोकलमधून प्रवास करीत मोबाइलचोरल्याची घटना डोंबिवली-बदलापूरदरम्यान सोमवारी मध्यरात्री घडली. प्रवाशांनी चोप देत त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

विनोद जाधव (१९) असे त्याचे नाव आहे. आधार कार्ड अथवा अन्य कागदपत्रे नसतानाही विनाेदने सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास केला. मध्यरात्री १ वाजता लोकल बदलापूरला पोहोचणार होती. तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या विनोद याने विकास चौधरी या प्रवाशाचा मोबाइल हिसकावून घेतला. तेव्हा झोपेत असलेले विकास एकदम जागे झाले. सावध होऊन त्यांनी विनोदला पकडले. तेवढ्यात अन्य प्रवाशांनी विनोदला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणाचा कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अरशद शेख हे तपास करीत आहेत. सध्या कल्याण जीआरपीने विनोदला अटक केली आहे. विनोदकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्याने याआधी चोरी केली आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या चोरट्याचा ट्रेनने प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा लोकलमध्ये घुसला कसा, हा प्रश्न केला जात आहे. विनोदला मंगळवारी कल्याण रेल्वे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याचे सांगण्यात आले.
 
वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
सध्या फार कमी प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा आहे. काही दिवसांपूर्वी महिलांसाठी लोकल सुरू झाली. मात्र, आपल्याला लोकल प्रवासाची मुभा कधी मिळणार, या प्रतीक्षेत सर्वसामान्य प्रवासी आहेत. प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ आणि जीआरपी प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना सोडत आहेत. काही दिवसांपूर्वी बोगस ओळखपत्रासह काही प्रवाशांना पकडले होते, तरीही अशा घटना घडतच असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Passenger Catch Mobile Thief in Local Train, Incident between Dombivali-Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.