Breaking : परमबीर सिंग यांनी स्वत: च्या बंगल्यात स्वीकारले दोन कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 12:41 PM2021-07-23T12:41:36+5:302021-07-23T12:44:14+5:30

Parambir Singh : ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल, उपायुक्त पराग मणेरेसह५ जणांवर गुन्हा

Parambir Singh accepted Rs 2 crore in his bungalow | Breaking : परमबीर सिंग यांनी स्वत: च्या बंगल्यात स्वीकारले दोन कोटी

Breaking : परमबीर सिंग यांनी स्वत: च्या बंगल्यात स्वीकारले दोन कोटी

Next

जमीर काझी

मुंबई : वादग्रस्त व भ्रष्टाचाराच्या आरोपात गुरफटलेल्या जेष्ठ आयपीएस अधिकारी  परमबीर सिंग यांच्यावरील तक्रारीचा आलेख वाढत राहिला आहे.ठाणेचे आयुक्त असताना खोट्या गुन्ह्यात अडकून एकाकडून ४.६८ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष म्हणजे  निम्मी रक्कम ठाण्यातील  त्याच्या तत्कालिन शासकीय बंगल्यात वसूल करून घेतली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या ८ कोटीचा भूखंड जबरदस्ततीने केवळएक कोटीला खरेदी खत बनवून घेतला आहे.

या प्रकरणी परमबीर यांच्यासह तत्कालीन ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त व सध्या मुंबई आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पुनामिया,सुनील जैन, मनोज घोटकर अशी अन्य आरोपींची नावे आहेत. शरद मुरलीधर अग्रवाल या बिल्डरने त्याच्याविरुद्ध कोपरी स्वतः कोपरी पोस्टे, गुन्हा क्रमांक - 176/2021 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयमध्ये  कोपरी पोलिस स्टेशन मध्ये. दिनां २३/०७/२०२१ रोजी रात्री फिर्यादी शरद अग्रवाल  यांचेंकडुन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन गु. र. क्र. १७६/२०२१  भादंवि ३८४, ३८५,३८८,३८९,४२०,३६४ अ, ३४ १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.परमबीर सिंग यांचे सोबत संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपी आहेत व पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे ( गुन्हे) करत आहेत.

Web Title: Parambir Singh accepted Rs 2 crore in his bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.