मुंब्रा आणि दिवा परिसरात खळबळ;24 तासात आढळले तीन अनोळखी मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:13 PM2021-10-13T21:13:59+5:302021-10-13T21:15:33+5:30

Deadbodies Found : या मृतदेहाजवळ बाधकामांसाठी वापरण्यात येणारा मेजरटेप आढळला होता.

Panic situation in Mumbra and Diva area; Three unidentified bodies found in 24 hours | मुंब्रा आणि दिवा परिसरात खळबळ;24 तासात आढळले तीन अनोळखी मृतदेह

मुंब्रा आणि दिवा परिसरात खळबळ;24 तासात आढळले तीन अनोळखी मृतदेह

googlenewsNext
ठळक मुद्देदुसरा मृतदेह संध्याकाळी खर्डी गावातील तंत्रनिकेतन महाविद्यालया जवळील झाडामध्ये आढळून आला होता.

मुंब्रा - मागील चोविस तासामध्ये मुंब्रा आणि दिवा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आढळून आलेल्या मृतदेहां मध्ये पहिला मृतदेह मंगळवारी दुपारी सोनाजी नगर भागातील चर्च जवळ आढळून आला होता.तर दुसरा मृतदेह संध्याकाळी खर्डी गावातील तंत्रनिकेतन महाविद्यालया जवळील झाडामध्ये आढळून आला होता.

या मृतदेहाजवळ बाधकामांसाठी वापरण्यात येणारा मेजरटेप आढळला होता. तीसरा मृतदेह बुधवारी रेतीबंदर येथील खाडीत आढळून आला.कायदेशीर कारवाई नंतर पोलिसांनी तीन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले असून,या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Panic situation in Mumbra and Diva area; Three unidentified bodies found in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.