चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्याकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांना केली धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:51 PM2021-12-06T13:51:46+5:302021-12-06T13:54:15+5:30

Chaityabhumi News : राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेतायेत तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेतात. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला.

Panic situation of All India Panther activists outside Chaityabhoomi; He pushed the police | चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्याकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांना केली धक्काबुक्की

चैत्यभूमीबाहेर ऑल इंडिया पँथरच्या कार्याकर्त्यांचा गोंधळ; पोलिसांना केली धक्काबुक्की

Next

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, शिवाजी पार्क येथे येत असतात. मात्र, मुंबईतील चैत्यभूमीवर काही वेळेसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना पोलिसांनी रोखल्यानं काही अनुयायी संतापले. या अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. ऑल इंडिया पँथरचे कार्यकर्त्यांनी चैत्यभूमीच्या बाहेर गोंधळ घातला. 


राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेतायेत तर त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते देखील त्यापद्धतीत दर्शन घेतात. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं आयोजन कर्त्यांचं म्हणणं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. 

 

Web Title: Panic situation of All India Panther activists outside Chaityabhoomi; He pushed the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.