प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:11 AM2021-04-15T06:11:11+5:302021-04-15T06:11:47+5:30

Bihar : ही घटना गया शहरातील वझीरगंज भागात घडली. तिचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

Panchayat punishes for making love, video of the incident goes viral on social media | प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

प्रेम केल्याची पंचायतने दिली भयंकर शिक्षा, सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Next

गया (बिहार) : प्रेम प्रकरणातील दलित व्यक्तिची कानउघडणी तर करण्यात आली; परंतु धक्कादायक म्हणजे पंचायत बोलावून फरशीवर करण्यात आलेली थुंकी त्याला चाटण्यास व लघवीही पिण्यास भाग पाडण्यात आले. ही घटना गया शहरातील वझीरगंज भागात घडली. तिचा व्हिडिओ समाज माध्यमांवर पसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
व्हिडिओत ही व्यक्ती फरशीवर गुडघे टेकून थुंकी चाटताना दिसतो. अनेक जण फरशीवर थुंकले व प्रेम केल्याची शिक्षा म्हणून त्या थुंकी त्याने चाटल्या. थुंकी चाटल्यानंतर त्याला लघवीही पिण्यास भाग पाडले गेले.
या दलित व्यक्तिने त्याच्या प्रेम प्रकरणाची कबुली दिल्यावर पंचायतने ही कारवाई केली. नुकतीच ही व्यक्ती महिलेसोबत पळून गेली होती. महिलेच्या कुटुंबाने त्या दोघांना पकडले व दलित व्यक्तिला पंचायतीत आणले. पंचायतचे सदस्य आणि सरपंचाच्यासमोर पीडित व्यक्तिला अमानवी छळाला तोंड द्यावे लागले. समाज माध्यमांवर व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. 

या छळाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात गुंतलेल्या सगळ्यांवर कारवाई केली जाईल
-आदित्य कुमार, 
गयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक 

Web Title: Panchayat punishes for making love, video of the incident goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.