उल्हासनगरात दोन गावठी कट्ट्यासह एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 06:56 PM2020-10-28T18:56:34+5:302020-10-28T18:57:04+5:30

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

One arrested in Ulhasnagar along with two pistol | उल्हासनगरात दोन गावठी कट्ट्यासह एकाला अटक

उल्हासनगरात दोन गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Next
ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-१ सी ब्लॉक परिसरातील डी टी कलानी कॉलेजसमोर एक जण गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ सी ब्लॉक डी टी कलानी कॉलेज समोर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ५ जिवंत काडतुसासह २ गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकाला उल्हासनगरपोलिसांनीअटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-१ सी ब्लॉक परिसरातील डी टी कलानी कॉलेजसमोर एक जण गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी साफ़ळा रचून संशयित उभा असलेल्या मोहम्मद अब्दुल अब्बास याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी मोहम्मद अब्बासी याला अटक केली असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीने ज्यांच्याकडून गावठी कट्टा खरेदी केला. त्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात ओमी कलानी टीमचा पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी शहरातील असून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यांच्यावर अंबरनाथ मटका चौकात तलवारीने हल्ला करणारे गुन्हेगार शहरातील असल्याचे उघड झाले. एकूणच शहरात गुन्हेगारी वाढल्याची टीका पुन्हा सर्वथरातून होत आहे.

Web Title: One arrested in Ulhasnagar along with two pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.