One arrested with six lakh Ganja in Thane | ठाण्यात सहा लाखांच्या गांज्यासह एकाला अटक 
ठाण्यात सहा लाखांच्या गांज्यासह एकाला अटक 

ठळक मुद्देइरशाद हा कल्याणचा रहिवासी असून त्याला 14 मे रोजी अटक केली आहे.39 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

ठाणे -  मुंब्रा बायपास रोड येथील बंद टोलनाका येथे गांजा हा अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या इरशाद इकबाल इमानदारी (35) याला मुंब्रापोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून 39 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याची किंमत 5 लाख 95 हजार 930 रुपये इतकी आहे. इरशाद हा कल्याणचा रहिवासी असून त्याला 14 मे रोजी अटक केली आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायदा कलम 8(क),20,22अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.


Web Title: One arrested with six lakh Ganja in Thane
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.