Nirbhaya Case: again Avoiding by convicts to execute punishment; Appeal to Supreme Court Again | Nirbhaya Case : पुन्हा दोषीची फाशीच्या शिक्षेसाठी टाळाटाळ; सर्वोच्च न्यायालयात अपील

Nirbhaya Case : पुन्हा दोषीची फाशीच्या शिक्षेसाठी टाळाटाळ; सर्वोच्च न्यायालयात अपील

ठळक मुद्देया हायकोर्टाच्या आदेशाला दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले आहे. आता या प्रकरणातील विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार या चार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे मुकेश याला फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुकेशने केलेल्या दया याचिकेमुळे फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. निर्भयाच्या चारही दोषींना २२ जानेवारीऐवजी आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फासावर चढविले जाणार असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले. कोर्टाने नवीन डेथ वॉरंट जारी केला आहे. मात्र, या हायकोर्टाच्या आदेशाला दोषी पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले आहे. 

ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. चारही दोषी फाशीची शिक्षा लांबणीवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अलीकडेच दोषी मुकेशने दया याचिका सादर केली होती. त्यामुळे २२ जानेवारीला दिली जाणारी फाशीची शिक्षा लांबणीवर गेली. पुन्हा दिल्ली कोर्टाने नवीन डेथ वॉरंट काढत नवीन तारीख म्हणजेच १ फेब्रुवारी निश्चित केली असताना आता दोषी पवनने सर्वोच्च न्यायालयात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान केले आहे. याआधी हायकोर्टाने पवन अल्पवयीन असल्याचा त्याचा दावा फेटाळला होता.   
 

Nirbhaya Case : आता सुटका नाही...! 1 फेब्रुवारीला फाशी देणार; दिल्ली न्यायालयाने वेळही सांगितला

गुरुवारी रात्री केंद्रीय गृह मंत्रालयाने मुकेशची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली होती. मात्र, आज राष्ट्रपतींना ही याचिका फेटाळली. त्यानंतर चौघांच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे होती. निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना पटियाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही फाशी पुन्हा लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहेत. पवनने दिलेल्या कोर्टाच्या आदेशाला आव्हानामुळे आता या प्रकरणातील विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार या चार दोषींना १ फेब्रुवारीला फाशी होणार की नाही यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Nirbhaya Case: again Avoiding by convicts to execute punishment; Appeal to Supreme Court Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.