धक्कादायक! 'तुमच्यामुळे कोरोना पसरला' म्हणत शेजाऱ्याने नर्सिंग स्टुडंटवर चाकूने केला वार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:10 PM2021-05-18T16:10:30+5:302021-05-18T16:12:59+5:30

अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसने यात आपला जीव गमावला आहे. पण त्यांच्या या बलिदानाला काही लोक समजून घेण्यास तयार नाहीत.

Neighbour stabs nursing student accusing her for covid spread in area Bengluru | धक्कादायक! 'तुमच्यामुळे कोरोना पसरला' म्हणत शेजाऱ्याने नर्सिंग स्टुडंटवर चाकूने केला वार

धक्कादायक! 'तुमच्यामुळे कोरोना पसरला' म्हणत शेजाऱ्याने नर्सिंग स्टुडंटवर चाकूने केला वार

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अजूनही थांबलेला नाही. रोज हजारो लोक संक्रमणामुळे आपला जीव गमावत आहेत. लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे.  कोरोनाने ग्रस्त रूग्णांना वाचवण्यासाठी मेडिकल वर्कर्स दिवसरात्र झटत आहे. ते हे त्यांच्या जीवाची पर्वा न करता करत आहेत. अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसने यात आपला जीव गमावला आहे. पण त्यांच्या या बलिदानाला काही लोक समजून घेण्यास तयार नाहीत. काही लोक त्यांच्यावरच कोरोनाचा प्रसार करत असल्याचा आरोप करत हल्ले करत आहेत.

अशीच एक घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरूच्या लक्ष्मीपुरम भागातून समोर आली आहे. लक्ष्मीपुरमच्या इंदिरानगर भागात तीन लोकांनी एका २० वर्षीय नर्सिंग स्टुडंट आणि तिच्या वडिलांवर हल्ला केला. हल्लेखोरांना वाटत आहे की, त्यांच्या भागात नर्सिंग स्टुडंट आणि तिच्या परिवारामुळेच कोरोना पसरला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या आरोपींविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. (हे पण वाचा : एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर तरूणाचं दोन बहिणींशी लग्न, नवरदेवाला अटक; समोर आला मोठा ट्विस्ट...)

याप्रकरणी ज्या लोकांविरोधात एफआय़आर नोंदवली गेली आहे. त्यांची नावे प्रभू, त्याचा भाऊ अर्जुन आणि भाचा राम अशी आहेत. नर्सिंग स्टुडंट प्रियदर्शनीने पोलिसांना सांगितलं की, तिची आई सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाने संक्रमित झाली होती आणि नंतर ती कोरोनातून बरी झाली होती. प्रियदर्शनीची बहीण सपनाने सांगितलं की, प्रभूला एप्रिलमध्ये कोविड झाला होता आणि त्याने याचं कारण तिच्या परिवाराला धरलं होतं.

प्रियदर्शनीच्या वडिलांनी आरोप लावला की, ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. ते लोक शुक्रवारी त्यांना शिव्याही देत होते. जेव्हा त्यांनी याचा विरोध केला तेव्हा तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान प्रियदर्शनीने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर तिच्यावर चाकूने हल्ला केला. नंतर प्रियदर्शनीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आणि नंतर तिने पोलिसात तक्रार दिली.
 

Web Title: Neighbour stabs nursing student accusing her for covid spread in area Bengluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.